नवी दिल्ली :दिल्ली कांजवाला हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी सहावा आरोपी आणि कार मालक आशुतोष याला अटक केली आहे. घटनेनंतर गुन्हा लपवल्याचा आरोप आहे. (Car owner arrested in Kanjhawala case) अंजलीच्या मृत्यूप्रकरणी आतापर्यंत एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर सातवा आरोपी अद्याप पोलिसांच्या आवाक्याबाहेर आहे. या दोघांचीही नावे एफआयआरमध्ये जोडण्यात आली आहेत. आशुतोषचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यात तो व्यथित झालेला दिसत आहे.
Kanjhawala case : कांजवाला प्रकरणात गाडी मालक अटक; सातवा आरोपी अंकुश अजून पोलिसांपासून दूर - कांजवाला प्रकरणात गाडी मालक अटक
कांजवाला प्रकरणात कार मालकाला अटक (Car owner arrested) दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी सहावा आरोपी आशुतोष याला अटक केली. घटनेनंतर गुन्हा लपवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ( kanjhawala case seventh accused ) तसेच सातवा आरोपी अंकुश अजूनही पोलिसांपासून दूर आहे.
कांजवाला प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे नवनवीन खुलासे होत आहेत. गुरुवारी दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, या प्रकरणात पाच नव्हे तर सात जणांचा समावेश आहे. कारचे मालक आशुतोष हे देखील त्यापैकीच एक. ड्रायव्हिंग लायसन्स नसलेल्या अमितला आशुतोषनेच आपली कार दिली होती. या घटनेनंतर आशुतोषने कार लपवण्यात मदत केली आणि पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही. आशुतोष व्यतिरिक्त, अंकुश या दोन नवीन आरोपींमध्ये होते ज्यांच्याबद्दल पोलिसांनी सांगितले होते. या दोघांचीही नावे एफआयआरमध्ये जोडण्यात आली आहेत. अंकुश अजूनही पोलिसांपासून दूर आहे. (ankush still away from police )
कथित मैत्रिण निधीही संशयाच्या भोवऱ्यात :कांजवाला हिट अँड रन प्रकरणात अंजलीचा मृत्यू झाल्यानंतर तिची कथित मैत्रिण निधीही संशयाच्या भोवऱ्यात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुशलाच या घटनेची माहिती होती आणि तरीही अमितकडे परवाना नसल्याने त्याने आरोपीला ड्रायव्हर म्हणून अमितऐवजी दीपक असे नाव देण्याचा सल्ला दिला. घटनेच्या वेळी तो कार चालवत होता. त्यामुळे अंकुशच्या सांगण्यावरून पोलिसांची दिशाभूल करून चुकीची माहिती देण्यात आली. अंकुश हा अमितचा भाऊ असल्याची माहिती मिळाली आहे. दिल्ली पोलिसांचे 18 वेगवेगळे पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत. काल आणखी दोन नावांचा समावेश झाल्यानंतर त्यांच्या अटकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणातील आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये आशुतोष पांढऱ्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. यादरम्यान तो खूपच घाबरलेला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी चक्कर मारत असल्याचेही दिसून येत आहे. सध्या याप्रकरणी पोलिसांनी एकूण सहा आरोपींना अटक केली असून, आता आणखी एका आरोपीला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आवश्यकता भासल्यास पोलीस न्यायालयाकडे लाय डिटेक्टर चाचणीची विनंती करू शकतात.