कोटा -शहरातील चंबळ नदीच्या छोट्या पुलावर मोठा अपघात झाला आहे. या अपघात आज सकाळी वरातीची कार चंबळ नदीत पडली ( Car Fell In Kota ChambalRiver ). ज्यामध्ये नवदेवाचा समावेश होता. यामध्ये नवदेवासह 9 जणांचा मृत्यू झाला आहे ( 9 Died In Kota Road Accident ). ही गाडी पडताना कोणी पाहिली नाही. तेथून जाणाऱ्या लोकांनी कार पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडून महापालिकेच्या बचाव पथकाला माहिती मिळाली आहे. त्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
बचावकार्यात 9 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत ( 9 Including The Groom Died In Kota ). यामधील सर्वांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला आहे. कार नदीत कशी पडली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी सर्व व्यक्तींचे मृतदेह ताब्यात घेऊन एमबीएस रुग्णालयाच्या शवागारात हलवले आहेत. महापालिकेचे डायव्हर विष्णू शृंगी आणि चालक सुरेश मंडावत यांनी सांगितले की, वरात चौथ का बरवडा ते उज्जैनकडे निघाली होती. पहाटे ५ वाजता हॉटेलमध्ये चहा पिताना हे लोक आपल्या कुटुंबीयांशी बोलले होते. त्यानंतर अपघाताचे घटना समोर येत आहे.