महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Punjab Lok Congress: कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा 'पंजाब लोक काँग्रेस' भाजपमध्ये विलीन होणार - Captain Amarinder Singh

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेस भाजपमध्ये विलीन होणार आहे. कॅप्टन परदेशातून परतल्यानंतर यावर अंतिम निर्णय होईल, असे सांगण्यात येत आहे. ( Punjab Lok Congress ) दुसरीकडे, अमरिंदर सिंग यांना भाजपमध्ये मोठी जबाबदारी मिळू शकते अशी शक्यता वर्तवली आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग
कॅप्टन अमरिंदर सिंग

By

Published : Jul 1, 2022, 4:47 PM IST

नवी दिल्ली -पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष 'पंजाब लोक काँग्रेस' भारतीय जनता पक्षात विलीन होणार आहे. ( Captain Amarinder Singh ) पंजाब विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी म्हणजेच गेल्या वर्षी अमरिंदर सिंग यांनी नवा पक्ष स्थापन केला होता. कॅप्टनचे वय 80 वर्षे असून अशा व्यक्तीला भाजपमध्ये तिकीट दिले जात नाही, त्यामुळे कॅप्टन अमरिंदर यांनी वेगळा पक्ष काढला. (2024)च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपचे लक्ष पंजाबमधील 13 जागांवर आहे.

अमरिंदर सिंग यांना मोठी जबाबदारी मिळू शकते - हे लक्षात घेण्यासारखे आहे की यापूर्वी माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला होता. पक्षाचे विलीनीकरण केल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांना नवीन ऑफर मिळू शकते. वृत्तानुसार, उपराष्ट्रपतीपदासाठी कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नाव दिले जाऊ शकते. कॅप्टन अमरिंदर सिंग पाठीच्या शस्त्रक्रियेसाठी लंडनला गेले असून पुढील आठवड्यात ते भारतात परतणार आहेत. त्यांचे भारतात आगमन झाल्यानंतर एकीकरणाची प्रक्रिया सुरू होईल.

नेत्यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश - कॅप्टन यांनी (2022)ची विधानसभा निवडणूक स्वतंत्र पक्ष म्हणून लढवली असली तरी त्यांना यश मिळाले नाही आणि ते स्वतः निवडणूक हरले. त्याचवेळी अमरिंदर सिंग यांनी गेल्या वर्षी काँग्रेस सोडल्यानंतर अनेक काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि राज्यमंत्री सुनील जाखड यांच्यासह राजकुमार वेरका, सुंदर श्याम अरोरा, बलबीर सिंग सिद्धू आणि गुरप्रीत सिंग या अन्य चार नेत्यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला होता.

हेही वाचा -सत्ताधारी पक्षाला शरम आली पाहिजे: नुपूर शर्मा विरुद्ध सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणांवर काँग्रेसची प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details