नवी दिल्ली Canada Demanded Security For Diplomats:कॅनडानं नवी दिल्लीतील उच्चायुक्तालय, मुंबई, चंदिगड, बेंगळुरू येथील व्यावसायिक दूतावासाला अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी केलीय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मिळालेल्या धमक्यांच्यानंतर कॅनडाच्या उच्चायुक्तांनी भारत सरकारला अवाहन केलंय. देशात राहणाऱ्या राजदूतांना, कॅनडाच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची विनंती त्यांनी भारत सरकारकडं केलीय. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावामुळं राजनैतिक संबंध ताणले गेले आहेत.
कॅनेडियन कर्मचाऱ्यासांठी कडक सुरक्षा : कॅनेडियन उच्चायुक्तालयानं भारतात कॅनेडियन नागरिकांसाठी आपली सेवा कायम ठेवण्याचा निर्धार केला आहे. "आमचं उच्चायुक्तालय भारतातील सर्व वाणिज्य दूतावास कार्यान्वित आहेत. आम्ही देशात नागरिकांना सेवा देत आहोत. ग्लोबल अफेअर्स कॅनडा आमच्या मिशन, कर्मचार्यांच्या सुरक्षेवर सतत लक्ष आहे. तसंच राजदूत, कर्मचाऱ्यासांठी कडक सुरक्षा व्यावस्था करण्यात आली आहे," असं एका अधिकाऱ्यांन सांगितलंय.
कॅनडाच्या वाणिज्य दूतांना सुरक्षा द्या : दोन्ही देशातील वाढत्या तणावपूर्ण वातावरणात, कॅनडाचे अधिकारी भारतातील त्यांच्या राजदूत तसंच नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करत आहेत. भारतातील काही राजदूतांना विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धमक्या आल्या आहेत. त्यामुळं कॅनडानं सावधगिरीचं पाऊल म्हणून, भारतातील कर्मचारी उपस्थिती तात्पुरती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, ग्लोबल अफेयर्स कॅनडानं स्पष्ट केलंय की, भारतानं कॅनडाच्या वाणिज्य दूतांना सुरक्षा प्रदान करून आपली जबाबदारी पाळावी.