कोची - कोरोना लस कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी चार आठवड्यांचा वेळ पुरेसा आहे, की व्यक्तीला 84 दिवस प्रतीक्षा करावी लागणार यावर केरळ हायकोर्टाने आपला निकाल राखून ठेवला आहे. या मुद्द्यावर कायटेक्स गारमेंट्स लिमिटेडने न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या याचिकेद्वारे 84 दिवस प्रतीक्षा न करता आपल्या कर्मचाऱयांना कोविशिल्डचा दुसरा डोस देण्याची परवानगी मागण्यात आली आहे.
कायटेक्स कंपनीने आपल्या याचिकेत म्हटले आहे, की कंपनीने यापूर्वीच त्यांच्या पाच हजार कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला आहे. त्याचबरोबर जवळपास 93 लाख रुपये खर्च करून दुसऱ्या डोसची व्यवस्था केली आहे. मात्र सरकारच्या निर्बंधामुळे कर्मचाऱ्यांना डोस देण्यात आलेले नाहीत.
हे ही वाचा -सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांचा शपथविधी सोहळा संपन्न, इतिहासात प्रथमच...
न्यायमूर्ती पीबी सुरेश कुमार यांनी केंद्र, राज्य सरकार आणि कायटेक्स कंपनीचा युक्तीवाद ऐकल्यानंतर म्हटले की, याबाबत न्यायालय 2 सप्टेंबर रोजी आपला निकाल देईल. कायटेक्स कंपनीकडून वकील ब्लेज के. जोस यांनी म्हटले की, जर कोणी मोफत कोरोना लस घेत असेल तर सरकार दोन डोसमध्ये 84 दिवसांच्या अंतराची सक्ती करू शकते. मात्र जर एखादा व्यक्ती स्वत: खर्च करून दुसरा डोस घेत असेल तर त्याला चार आठवड्यानंतर जोस घेण्याची परवानगी देण्यात यावी. कोरोना लसीच्या प्रभावासाठी दोन डोसच्या मध्ये हे न्यूनतम निर्धारित अंतर आहे. त्यांनी म्हटले की, दोन डोसमध्ये सर्वाधिक अंतर 84 दिवसांचे आहे. मात्र कोविशिल्डचा दुसरा डोस चार आठवड्यानंतर घेता येऊ शकतो. जोस यांनी म्हटले की, ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंसर परदेशी जाणाऱ्या लोकांना चार आठवड्यानंतर कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्याची परवानगी देण्यात आली. त्यांना 84 दिवस प्रतिक्षा करावी लागली नाही.
हे ही वाचा -न्यायाधीशांनी निकालातून बोलावे, तोंडी आदेश देऊ नयेत- सर्वोच्च न्यायालय
केंद्र सरकारने या युक्तीवादाचा विरोध करताना म्हटले की, कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर लसींचा प्रभाव वाढवण्यासाठी 84 दिवसांचा करण्यात आला आहे. हा नियम नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन अॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-19 (NEGVAC) द्वारे बनवण्यात आला आहे.