महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'Bydget नव्हे BUDGET', शशी थरूर यांना रामदास आठवलेंकडून इंग्रजीचे धडे; थरूर म्हणाले... - रामदास आठवले शशी थरूर

संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी मागील बाकावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले बसले होते. आठवलेंच्या मुद्रेवरील हावभाव हेरून शशी थरूर यांनी एक ट्विट केले. रामदास आठवले यांनी पकडलेली चूक थरूर यांनी मान्य केली आणि त्यावर थरूर यांनी प्रत्यूत्तर दिलं.

रामदास आठवले शशी थरूर
रामदास आठवले शशी थरूर

By

Published : Feb 11, 2022, 8:59 AM IST

Updated : Feb 11, 2022, 10:34 AM IST

हैदराबाद - इंग्रजी वक्तृत्वशैली आणि इंग्रजीवर प्रभुत्व असणारे काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या इंग्रजीतील चूका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी निदर्शनास आणून दिल्या. रामदास आठवले यांनी थरूर यांचे स्पेलिंग चुकलेले शब्द ट्विटरवर टाकल्याने नेटकऱ्यांचे मनोरंजन झाले. तसेच त्यावर गंमतीशीर कमेंट्स देखील आल्या. आठवलेंच्या ट्विटला थरूर यांनीही टोला लगावत प्रत्यूत्तर दिलं.

संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी मागील बाकावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले बसले होते. आठवलेंच्या मुद्रेवरील हावभाव हेरून शशी थरूर यांनी एक ट्विट केले. शशी थरूर यांनी म्हटले की, अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेवर अर्थमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर केंद्रीय मंत्र्यांनादेखील विश्वास वाटत नाही. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव सांगून जात असल्याचे थरूर यांनी म्हटले. शशी थरूर यांच्या या ट्वीटला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उत्तर देत त्यांची इंग्रजीतील चूक पकडली. रामदास आठवले यांनी थरूर यांना Bydget नव्हे तर BUDGET आणि rely नसून reply असा शब्द असल्याचे सांगत चूक लक्षात आणून दिली.

रामदास आठवले यांनी पकडलेली चूक थरूर यांनी मान्य केली आणि त्यावर थरूर यांनी प्रत्यूत्तर दिलं. शशी थरूर यांनी ट्विट करत आठवले आणि सीतारमण यांनाही चिमटा काढला. थरूर म्हणाले की, निष्काळजीपणे टाइप करणे हे वाईट इंग्रजीपेक्षा अधिक वाईट आहे. जेएनयूमधील एकाला तुमच्या शिकवणीचा फायदा होऊ शकतो, असे ट्विट केले. शशी थरूर आणि रामदास आठवले यांच्यात झालेल्या ट्वीटमुळे नेटकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन झाले. तसेच नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये रामदास आठवले स्टाईल कवितांचा वर्षावही केला.

Last Updated : Feb 11, 2022, 10:34 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details