महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Ashwini Vaishnav On Railway Project : मंत्रिमंडळाची 7 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी; महाराष्ट्रातील मुदखेड ते मेडचल प्रकल्पाचा समावेश - नवीन रेल्वे मार्ग

केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने सात नव्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या प्रकल्पात महाराष्ट्रातील मुदखेड ते मेडचल या प्रकल्पाचा समावेश आहे.

Ashwini Vaishnav On Railway Project
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

By

Published : Aug 17, 2023, 12:40 PM IST

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने सात नवीन रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. तब्बल 32 हजार 500 कोटींचे हे सात प्रकल्प असून 2 हजार 339 किमीचा नवीन रेल्वे मार्ग देशात जोडला जाणार आहे. हे सात प्रकल्प महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, तेलंगाणा, ओडिशा आणि गुजरातमध्ये होणार असल्याची माहितीही अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. या रेल्वे प्रकल्पात मुदखेड ते मेडचल या महाराष्ट्रातील प्रकल्पाचाही समावेश करण्यात आला आहे.

रेल्वे मार्गांचे चौपदरीकरण आणि अपग्रेडेशनचा समावेश :देशातील रेल्वेला आणखी मजबूत करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने विविध प्रकल्पाचे नियोजन केले आहे. या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. यात सध्याच्या रेल्वे मार्गांचे चौपदरीकरण, दुहेरीकरण आणि अपग्रेडेशनचा समावेश आहे. या प्रकल्पासह अतिरिक्त 120 दशलक्ष टन मालाची वाहतूक करता येणार आहे. स्थलांतरित कामगार आणि विद्यार्थ्यांनाही या प्रकल्पामुळे प्रवासात मदत होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. रेल्वेने प्रस्तावित केलेल्या या प्रकल्पांना केंद्र सरकारकडून 100 टक्के निधी देण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे देशातील प्रमुख औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्रांना जोडण्यात येणार असल्याची माहितीही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना दिली.

रेल्वेतील गर्दी टाळून वाहतूक सुरळीत होणार :मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या प्रकल्पामुळे सध्याची लाईन क्षमता वाढवण्यात येणार आहे. हे नवीन प्रकल्प झाल्यामुळे रेल्वेचे कामकाजही सुरळीत पार पडणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या प्रकल्पामुळे प्रवास आणि वाहतूकही सुलभ होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या प्रकल्पांचा आहे समावेश :

  • उत्तर प्रदेश : गोरखपूर छावणीतील वाल्मिकी नगर सिंगल लाइन सेक्शन 89.264 किमी
  • बिहार : 1) पश्चिम चंपारण 6.676 किमीचे दुहेरीकरण 2) गया, औरंगाबादमध्ये 132.57 किमी
  • आंध्र प्रदेश : गुंटूरमधील गुंटूर-बीबीनगर सिंगल लाइन विभागाचे दुहेरीकरण 1 किमी
  • तेलंगणा : नलगोंडा, यादद्री भुवनगिरी मार्ग 139 किमी
  • उत्तर प्रदेश : मिर्झापूर, सोनभद्रमध्ये 101.58 किमी चोपन-चुनार सिंगल-लाइन विभागाचे दुहेरीकरण
  • महाराष्ट्र : नांदेडमधील मुदखेड-मेडचल आणि महबूबनगर-धोन खंड विभागादरम्यान 49.15 किमी
  • तेलंगणा : निझामाबाद, कामारेड्डी, मेडक, वानापर्थी, जोगुलांबा, मेडचल-मलकाजगिरी
  • आंध्र प्रदेश : 1) महबूबनगर ते कुर्नूलिंग 294.82 किमी, 2) श्रीकाकुलम, विझियानगरम, विशाखापट्टणम दरम्यान 201 किमी
  • गुजरात : कच्छमधील समखियाली आणि गांधीधाममधील 53 किमी मार्ग
  • ओडिशा : नेरगुंडी-बरंग आणि रिटेल रोड-विझियानगरम (भद्रक, जयपूर, खोरधा, कटक आणि गंजम) दरम्यान 184 किमी
  • झारखंड : धनबाद, गिरीडीह, हजारीबाग, कोडरमामध्ये 201.608 किमी
  • पश्चिम बंगाल : पश्चिम बर्धमान 40.35 किमी, सोननगर-आंदल मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्प

ABOUT THE AUTHOR

...view details