लखनऊ -मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच ते आपल्या कामाला लागले आहेच. शनिवारी, योजना भवन येथे, मुख्यमंत्री योगी यांनी सर्व अतिरिक्त मुख्य सचिव आणि प्रधान सचिवांना 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. (Yogi Adityanath Instructed the Secretary) तसेच, त्यानंतर सर्व विभाग प्रमुखांनी कृती आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे.
भविष्यातील रणनीतीबाबतही विचारमंथन - याच भागात गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक अतिरिक्त मुख्य सचिव गृह अवनीश अवस्थी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि गुन्ह्यांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी भविष्यातील रणनीतीबाबतही विचारमंथन झाले आहे.
आर्थिक गुन्ह्यांवर प्रभावी कारवाई - गृह सचिव अवनीश अवस्थी यांनी पोलीस विभागाला जिल्हा स्तरावर पोलीस यंत्रणा सक्षम आणि नियोजनबद्ध पद्धतीने सक्षम करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वसामान्यांना अधिक चांगल्या पोलीस सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पोलिसांशी संबंधित लोकोपयोगी सेवा अधिक बळकट करण्यावरही त्यांनी भर दिला आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक संघटना, आर्थिक गुन्हे संशोधन शाखा (EOW), दक्षता, SIT आणि CBCID यांना भ्रष्टाचार आणि आर्थिक गुन्ह्यांवर प्रभावी कारवाई करण्यासाठी अधिक सक्षम आणि प्रभावी बनवण्यास सांगितले आहे.
अभियोजन युनिट स्थापन करण्याचाही विचार - पारदर्शकता आणण्यासाठी आणि विविध पोलीस तुकड्यांमधील कामाला गती देण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराला आणखी प्रोत्साहन दिले जाईल, असे गृह अतिरिक्त मुख्य सचिवांनी सांगितले. यासोबतच महिला बीट सिस्टीम आणि अँटी रोमियो स्क्वॉड आणखी मजबूत करण्यात येणार आहे. गुंडा-माफिया आणि महिलांच्या गुन्ह्यांमध्ये जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी विशेष अभियोजन युनिट स्थापन करण्याचाही विचार केला जाईल असही यावेळी झालेल्या बैठकीत सांगण्यात आले आहे.
हेही वाचा -Biden Meets Ukraine Foreign Ministers : जो बायडेन यांनी घेतली युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट