टोकियोसात्विकसाईराज रँकीरेड्डी Satwiksairaj Rankireddy आणि चिराग शेट्टी Chirag Shetty या स्टार भारतीय पुरुष दुहेरी जोडीने शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवला. या जोडीने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाच्या जपानी जोडी ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी Takuro Hoki and Yugo Kobayashi यांचा पराभव केला. त्यामुळे आता या स्टार भारतीय पुरुष दुहेरी जोडीने BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये BWF World Championships भारताने पहिले पदक निश्चित केले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या जागतिक क्रमवारीत 7व्या क्रमांकाच्या भारतीय जोडीने चमकदार कामगिरी केली. त्यांनी विजेतेपदाच्या दावेदार आणि गतविजेत्या जपानी जोडीला 24-22, 15-21, 21-14 असे पराभूत करत उपांत्य फेरी गाठली. यासह प्रथमच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत स्वत:साठी पदक निश्चित केले.
जागतिक चॅम्पियनशिपमधील दुहेरीत भारताचे दुसरे पदक निश्चित