सारण (छपरा) : महाराष्ट्रातून परतलेल्या ( A gold merchant was robbed by thieves ) सोन्याच्या व्यापाऱ्याचे १६ लाखांचे दागिने चोरट्यांनी लुटून ( robbing a merchant in Maharashtra) घटनास्थळावरून पळ काढल्याची घटना बिहारच्या छपरामध्ये ( Loot In Chhapra ) घडली आहे. ही घटना दरियापूर पोलीस ठाण्याच्या ( Dariyapur Police Station ) हद्दीतील महितन भागातील आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला.
Gold Merchant Looted: महाराष्ट्रातून परतलेल्या व्यापाऱ्याला बिहारमध्ये बंदुकीचा धाक दाखवून लुटले; सोने व्यापाऱ्याचे १६ लाखांचे दागिने लंपास - Loot In Chhapra
Gold Merchant Looted: छपरा येथे लूटमारीची मोठी घटना घडली ( Loot In Chhapra ) आहे. येथे महाराष्ट्रातून परतलेल्या सोन्याच्या व्यापाऱ्याला चोरट्यांनी लुटले ( gold merchant was robbed by thieves) आहे. .
![Gold Merchant Looted: महाराष्ट्रातून परतलेल्या व्यापाऱ्याला बिहारमध्ये बंदुकीचा धाक दाखवून लुटले; सोने व्यापाऱ्याचे १६ लाखांचे दागिने लंपास Loot In Chhapra](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16694212-thumbnail-3x2-looted.jpg)
पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले दागिने : मिळालेल्या माहितीनुसार, सोने व्यापारी दरियापूर पोलीस ठाण्याच्या मटीहान भागातून ऑटोने जात होते. निर्जन भागात त्यांचा ऑटो पोहोचताच दुचाकीस्वारांनी त्याला घेरले. यानंतर पिस्तुलचा धाक दाखवून सोने व्यावसायिकाची बॅग लुटून पळ काढला. बॅगेत सुमारे 16 लाख रुपयांचे दागिने भरले होते. हा दरोडा सुनियोजित असल्याचे दिसते. बॅगेतील दागिन्यांची माहिती चोरट्यांना आधीच होती. याप्रकरणी व्यापाऱ्याने दर्यापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलीस तपासत आहेत सीसीटीव्ही फुटेज : घटनेची माहिती मिळताच दरियापूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाच्या आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. जेणेकरून आरोपींची ओळख पटू शकेल. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही निवेदन दिले आहे. पीडित सोने व्यापाऱ्याच्या जबानीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल.