महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Businessman Murder case: व्यावसायिक हत्याकांड प्रकरण.. अंडरवर्ल्ड गँगस्टर बननांजे राजासह 9 जण दोषी

कर्नाटक राज्यातील अंकोला येथील व्यापारी आर एन नायक यांच्या हत्येप्रकरणी ( Businessman R N Nayaka Murder Case ) अंडरवर्ल्ड गँगस्टर बननांजे राजा ( Underworld Gangster Bannanje Raja ) याच्यासह ९ जणांना दोषी ठरविण्यात आले आहे. याप्रकरणी ४ एप्रिल रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

व्यावसायिकाची हत्या : अंडरवर्ल्ड गँगस्टर बननांजे राजासह 9 जण दोषी
व्यावसायिकाची हत्या : अंडरवर्ल्ड गँगस्टर बननांजे राजासह 9 जण दोषी

By

Published : Mar 30, 2022, 7:14 PM IST

बेळगाव (कर्नाटक): अंकोला येथील व्यापारी आर.एन. नायक यांच्या हत्येप्रकरणी ( Businessman R N Nayaka Murder Case ) अंडरवर्ल्ड गँगस्टर बननांजे राजा ( Underworld Gangster Bannanje Raja ) याच्यासह ९ जणांना कोका ( Karnataka Control of Organised Crimes Act ) न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायाधीश सी.एम. जोशी यांनी शिक्षेचा निकाल राखून ठेवला आहे. न्यायाधीश 4 एप्रिल रोजी शिक्षा सुनावतील.

तिघे निर्दोष : 6व्या, 11व्या आणि 16व्या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सहावा आरोपी केरळचा रबदिन फिचाई, बेंगळुरूचा मोहम्मद शबंदारी हा ११वा आरोपी होता आणि उत्तरा कन्नडचा १६वा आरोपी आनंदा रमेश निर्दोष सुटला आहे.

व्यावसायिक हत्याकांड प्रकरण.. अंडरवर्ल्ड गँगस्टर बननांजे राजासह 9 जण दोषी

१२ आरोपी दोषी : उत्तर प्रदेशातील जगदीश पटेल हा दुसरा आरोपी होता. बेंगळुरू येथील अभि भांडगर हा तिसरा आरोपी, चौथा आरोपी उडुपीचा गणेश भजंत्री, केरळचा पाचवा आरोपी केएम इस्माईल, सातवा आरोपी हसन येथील महेश अछांगी, केरळचा संतोष एमबी आठवा, उडुपीचा नववा आरोपी बननांजे राजा, दहावा आरोपी जगदीश चंद्रराज बेंगळुरूचा आणि उत्तर प्रदेशचा अंकित कुमार कश्यप या 12 आरोपींना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे.

राज्यातील पहिले कोका प्रकरण : कोका ( Karnataka Control of Organised Crimes Act ) अंतर्गत, अंगोलामध्ये २१ डिसेंबर २०१३ रोजी आर एन नायकाच्या हत्येप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे राज्यातील पहिले कोका प्रकरण होते. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील के जी पुराणिकमठ आणि अतिरिक्त सरकारी वकील शिवप्रसाद अल्वा यांनी बाजू मांडली.

ABOUT THE AUTHOR

...view details