जयपूर : राजधानी जयपूरमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त असूनही, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. महाराष्ट्रातील एका व्यावसायिकाचे अपहरण करून 15 लाखांची खंडणी मागितल्याची घटना जयपूर शहरात समोर आली आहे. इतकंच नाही तर चालत्या गाडीत व्यापाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे.
आरोपींनी काढला पळ :तसेच व्यापाऱ्याचे कपडे काढूण न्यूड व्हिडिओ बनवत व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर अपहरण कर्त्यांनी व्यापऱ्याला रस्त्यावरच सोडून पळ काढला आहे. यानंतर व्यापाऱ्याने पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुहाना पोलिस स्टेशन पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत असुन त्यांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. घटनास्थळाच्या आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून खबऱ्यामार्फत चोरट्यांचा सुगावा घेणयाचे काम सध्या पोलीस करीत आहे.
5 लाख रुपयांची खंडणी : महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील लेख प्रज्वल मिठावाला यांच्या तक्रारीच्या आधारे सोमवारी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मुहाना पोलीस अधिकारी दिलीप सिंह यांनी सांगितले. प्रज्वल मिठावाला यांनी सांगितले की, आपण व्यवसायानिमित्त जयपूरला आलो होतो. 26 मे रोजी मानसरोवर परिसरातील हॉटेल ग्रीन ऑलिव्हमध्ये थांबलो होतो. दरम्यान, रात्री हॉटेलच्या बाहेर कारमध्ये आलेल्या तीन हल्लेखोरांनी मला त्यांच्या कारमध्ये बळजबरीने बसवले. त्यांनी मला गाडीतच बेदम मारहाण केली. तसेच माझी सुटका करण्यासाठी 15 लाख रुपयांची खंडणी मागितली, असा आरोप मिठावाल यांनी केला आहे.