महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Uttarakhand Bus Accident : गंगोत्री महामार्गावर भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली; 6 जणांचा मृत्यू - बस दरीत कोसळली

उत्तराखंडमधील गंगनानीजवळ एक प्रवासी बस खोल दरीत कोसळली. या बसमध्ये 33 यात्रेकरू होते. आतापर्यंत 6 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे.

Uttarakhand Bus Accident
उत्तराखंड बस अपघात

By

Published : Aug 20, 2023, 6:04 PM IST

Updated : Aug 20, 2023, 6:53 PM IST

पहा व्हिडिओ

उत्तरकाशी (उत्तराखंड) :उत्तराखंडमधील गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. गंगनानीजवळ एक खासगी प्रवासी बस खोल दरीत कोसळली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून, 27 जणांना वाचवण्यात यश आलंय. बसमध्ये एकूण ३३ यात्रेकरू होते. ते सर्व गुजरातचे रहिवासी होते. घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरू आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना रविवारी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास घडली.

बस गंगोत्री धामहून उत्तरकाशीच्या दिशेने जात होती : अधिक माहितीनुसार, गुजरातहून आलेल्या यात्रेकरूंनी भरलेली बस क्रमांक UK 07 PA 8585 गंगोत्री महामार्गावर गंगनानीजवळ खोल दरीत कोसळली. बस गंगोत्री धामहून उत्तरकाशीच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. जखमींना 108 सेवा आणि रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. बसमध्ये जवळपास 33 प्रवासी होते.

घटनास्थळी बचावकार्य सुरू : घटनेची माहिती मिळताच पोलीस, एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी बचावकार्य सुरू केले. उत्तरकाशीचे डीएम अभिषेक रुहेला आणि एसपी अर्पण यदुवंशी घटनास्थळी पोहोचले आहेत. 'मदतकार्यासाठी गरज भासल्यास डेहराडूनमध्ये हेलिकॉप्टर तयार ठेवण्यास सांगण्यात आल्याचे डीएम रुहेला यांनी सांगितले.

या ठिकाणी ट्रकचा अपघातही झाला होता : ज्या ठिकाणी बसचा अपघात झाला त्याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी एका ट्रकचा अपघात झाला होता. रविवारी झालेल्या अपघातात बस दरीत पडलेल्या ट्रकच्या मलब्यावर पडली. त्यामुळे बस थेट भागीरथी नदीत पडण्यापासून वाचली.

जखमींना नेण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था : गंगोत्री महामार्गावरील अपघाताबाबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी प्रभारी मंत्र्यांसह अधिकाऱ्यांशी बोलले आहेत. घटनेची माहिती घेत त्यांनी जखमींवर उपचार करण्यासाठी सर्व व्यवस्था सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गरज भासल्यास जखमींना नेण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

हे ही वाचा :

  1. Buldhana Bus Accident : एसटी बसचा अपघात; स्टिअरिंग रॉड लॉक झाल्याने गाडी पलटी, पाहा व्हिडिओ
  2. Army Vehicle Accident : लडाखमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले, 9 जवानांचा मृत्यू
  3. Rajasthan Accident : राजस्थानात बस आणि कारची भीषण धडक, ७ जणांचा जागीच मृत्यू
Last Updated : Aug 20, 2023, 6:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details