महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देव तारी त्याला कोण मारी; पुरलेले अर्भक काढले जिवंत, विहिरीत सापडली 2 दिवसांची मुलगी, तर मुलाला फेकले मात्र आई वाचली - 2 day old girl found live in well

देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय आज आला. गुजरातमध्ये पुरलेले अर्भक जिवंत बाहेर काढले. तसेच गुजरातमध्येच विहिरीत सापडली 2 दिवसांची मुलगी. दुसरीकडे कर्नाटकात तर मुलाला फेकले मात्र आई वाचली अशी एक घटना पुढे आली आहे. वाचा सविस्तर या घटनांमध्ये नेमके काय घडले.

देव तारी त्याला कोण मारी
देव तारी त्याला कोण मारी

By

Published : Aug 5, 2022, 5:21 PM IST

हैदराबाद - देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय देणाऱ्या तीन घटना आज समोर आल्या आहेत. त्यामधील 2 गुजरातमधील आहेत तर एक घटना कर्नाटकातील आहे. हे तीनही प्रसंग वाचून अंगावर काटा येतो. त्याचवेळी काहीही झाले तरी मृत्यू सहजी येत नाही हेच यातून दिसून येते.

रिकाम्या विहिरीत 2 दिवसांची मुलगी - गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील भेगावातमध्ये ( Gujarat Bhegaon incident ) एका 40 फूट खोल रिकाम्या विहिरीत दोन दिवसांची मुलगी आढळून ( Newborn girl thrown into well ) आल्याने एकच खळबळ उडाली. अज्ञात महिलेने तिचे कुकर्म लपवण्यासाठी त्या मुलीला विहिरीत सोडले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या मुलीला दोरीने बांधून निर्जल विहिरीत फेकल्याचे स्पष्ट होते. मुलीच्या पायाला मुंग्यानी चावा घेतला ( ant bit the girl's leg ) होता. सध्या मुलीला उपचारासाठी झायडस रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. बालकल्याण समितीनेही कार्यवाही सुरू केली आहे.

नवजात अर्भकला पुरले, जिवंत बाहेर काढले - दुसरीही एक घटना गुजरातमधीलच आहे. गुजरातमधील साबरकांठा येथील हिम्मतनगर येथे एका नवजात अर्भकाला ( buried the child in the ground ) जमिनीत पुरल्याची घटना समोर आली आहे. एक शेतकरी त्या रस्त्याने जात होता. त्याला जमिनीतून रडण्याचा आवाज आला. त्यावेळी शेतकऱ्यांनी जमीन खोदून पाहिले तर मुलगी दिसली. त्याने तिला बाहेर काढले, तेव्हा ती मुलगी जिवंत होती. तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. आता पोलिसांनी याबाबत शोधमोहीम हाती घेतली आहे. तर चिमुरडीला जिवंत जमिनीत गाडल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. आई वडिलांनीच तिला जमिनीत पुरल्याची माहिती आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

आईने मुलीला मारले, स्वतः थोडक्यात वाचली - तिसरी घटना आहे कर्नाटकातील. तेही उच्चभ्रू अशा सिलीकॉन सिटीमधील. मतिमंद मुलाला जन्म देणाऱ्या आईने आपल्या मुलाची हत्या केल्याची हृदयद्रावक घटना सिलिकॉन सिटीमध्ये घडली आहे. 4 ऑगस्ट रोजी संपंगी रामा नगर येथील अॅडवीट अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. पाच वर्षांच्या चिमुरडीची आईने चौथ्या मजल्यावरून फेकून हत्या केली. त्यानंतर तिने आत्महत्येचाही प्रयत्न केला. मात्र जवळच राहणाऱ्यांचे लक्ष गेल्याने ती वाचली. या घटनेचे भीषण दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

हेही पाहा - Buried Child Baby : आई वडिलांनीच नवजात अर्भकाला पुरले जमिनीत; दोघांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details