मुरादाबाद (उ. प्रदेश) : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे विनयभंगाच्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करणे महागात पडले आहे. विनयभंगाचा गुन्हा दाखल केला म्हणून गुंडांनी चक्क पीडितेच्या भावाचा प्रायव्हेट पार्ट कापला! (bullies cut private part of boy in moradabad). झाले असे की, आरोपींनी एका मुलीचा विनयभंग केला. यानंतर ते सातत्याने तिच्यावर तडजोडीसाठी दबाव टाकत होता. विनयभंगाची तक्रार मागे न घेतल्याने आरोपीच्या वडिलांनी धमकी दिली होती. त्यानंतर या गुंडांनी ही घटना घडवून आणली. (moradabad molestation case).
Private Part Cut: क्रूरतेचा कळस.. बहिणीची छेड काढणाऱ्यांनी भावाचं गुप्तांगच कापलं.. प्रकृती गंभीर - भगतपूर पोलीस ठाणे
मुरादाबादमध्ये विनयभंगाचा गुन्हा मागे न घेतल्याने गुंडांनी पीडितेच्या भावाचा प्रायव्हेट पार्ट कापला. (bullies cut private part of boy in moradabad). त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (moradabad molestation case). वाचा संपूर्ण बातमी..
मुलाची प्रकृती चिंताजनक : सुमारे 3 महिन्यांपूर्वी गावातील बिट्टू सिंग याने भगतपूर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या शेतकऱ्याच्या 14 वर्षीय मुलीचा विनयभंग केला. मुलीने विरोध करत मोठ्याने आवाज केल्याने आरोपी पळून गेला. पीडितेच्या वडिलांनी याप्रकरणी भगतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींवर तोडगा काढण्यासाठी दबाव टाकला जात होता. तडजोड न निघाल्याने आरोपींनी पीडितेच्या भावाचे गुप्तांग कापले. परिस्थिती गंभीर झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल : मुलाच्या वडिलांचे म्हणणे आहे की, ३१ डिसेंबर रोजी ते शेतातील पिकांना खत घालत होते. त्यांचा 12 वर्षांचा एकुलता एक मुलगा शेतातून परतत होता. त्यानंतर वाटेत आरोपी बिट्टू आणि त्याचे दोन भाऊ सुमित व बंटी यांनी त्याला शेतात ओढत नेले आणि धारदार शस्त्राने त्याचे गुप्तांग कापले. मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे वडिलांचे म्हणणे आहे. खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिन्ही आरोपींविरुद्ध भगतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.