तिरुपूर Bullet As Diwali Bonus : दरवर्षी दिवाळी आली की नोकरदारांना वाट असते ती दिवाळी बोनसची. तामिळनाडूतील एका व्यावसायिकानं आपल्या कर्मचाऱ्यांना असं काही दिवाळी बोनस दिलं आहे जे पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल.
दिवाळी बोनस म्हणून बाईक भेट : तामिळनाडूतील उद्योजक शिवकुमार यांनी त्यांच्या १५ कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून रॉयल एनफिल्ड बुलेट दिली आहे. त्यांनी चालकापासून व्यवस्थापकापर्यंत कोणताही भेदभाव न करता सर्वांना बोनस म्हणून दुचाकी दिल्या. शिवकुमार हे २० वर्षांहून अधिक काळापासून कोटगिरी परिसरात स्थायिक आहेत. येथे ते फुलकोबी, गाजर, बीटरूट, स्ट्रॉबेरी इत्यादी फळं आणि भाज्यांच्या लागवडीत गुंतले आहेत. शिवकुमार यांना दरवर्षी दिवाळीत त्यांच्या कर्मचाऱ्यांना सरप्राईज म्हणून खास भेटवस्तू देण्याची सवय आहे.
आवडीनुसार बाईक दिली : यावर्षी दिवाळी बोनससाठी शिवकुमार यांनी त्यांच्या ड्रायव्हरपासून ते इस्टेट मॅनेजरपर्यंत १५ कर्मचाऱ्यांची निवड केली. त्यांची वाहनांची आवड जाणून घेतल्यानंतर त्यांनी रॉयल एनफिल्ड हिमालयन, रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५०, रॉयल एनफिल्ड हंटर ३५०, यामाहा रे स्कूटर अशी १५ वाहनं बुक केली. त्यानंतर त्यांनी ही वाहनं कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट म्हणून दिली.