पाटणा ( बिहार ) : जमीन बळकावण्यासाठी लाच घेतल्याबद्दल न्यायालयाने फटकारले असतानाही, एका याचिकाकर्त्याच्या घरावर बेकायदेशीरपणे बुलडोझर चालवल्याबद्दल पाटणा उच्च न्यायालयाने बिहार पोलिसांना फटकारले ( house demolished to grab land ) आहे. न्यायमूर्ती संदीप कुमार हे सजोगा देवी यांच्या दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत होते. ज्यांचे घर 15 ऑक्टोबर रोजी पाडण्यात आले. यावेळी त्यांनी पोलिसांना ( Court questions police performance ) फटकारले.
न्यायालयाने फटकारले : येथेही बुलडोझर सुरू चालणार आहे का? तुम्ही कोणाचे प्रतिनिधीत्व करता, राज्याचे की राज्यातील काही खासगी व्यक्तींचे? कोणाचेही घर बुलडोझरने पाडू, असा तमाशा सुरू केला आहे, अशी टिपण्णी पाटणा उच्च न्यायालयाने ( Bulldozer runs on house to grab land ) केली. पुढे पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे ओढताना ते म्हणाले की, जर कोणाला काही समस्या असेल तर तो पोलिस ठाण्यात जाईल, लाच देईल आणि कोणाचेही घर पाडेल. मग दिवाणी न्यायालय बंद करा कायद्याची योग्य प्रक्रिया न पाळता पोलिसांनी हे घर बेकायदेशीरपणे पाडल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. त्यात सर्व अधिकाऱ्यांवर काही भूमाफियांचे हात असल्याचा ठपकाही ठेवण्यात आला.