नवी दिल्ली/ नोएडा : नोएडामध्ये एका महिलेसोबत गैरवर्तन करणारे कथित भाजप नेते श्रीकांत त्यागी ( BJP leader Shrikant Tyagi ) यांच्या घरावर सोमवारी सकाळपासून बुलडोझर फिरत आहे. यामध्ये त्यांचे ओमॅक्स सोसायटीत ( Omaxe Society ) केलेले अवैध बांधकाम पाडले. सकाळी नऊ वाजल्यापासून नोएडा प्राधिकरणाचे सहा बुलडोझर यासाठी तैनात करण्यात आले आहेत. श्रीकांत त्यागी यांच्या या अवैध बांधकामाबाबत गेल्या तीन वर्षांपासून तक्रारी केल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
अवैध बांधकामावर चालवला बुलडोझर पोलीस आयुक्त आलोक सिंह यांनी श्रीकांत त्यागी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणी पोलीस ठाणे प्रभारीला निलंबित करून नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी एका महिलेसोबत झालेल्या गैरवर्तनाच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर श्रीकांतचे प्रकरण तापले होते, तेव्हापासून तो फरार असल्याचे बोलले जात आहे.
असे संपूर्ण प्रकरण आहे -शुक्रवारी नोएडाच्या सेक्टर 93 बी ओमॅक्स ग्रँड सोसायटीमध्ये झाडे लावण्याबाबत संपूर्ण प्रकरण घडले. ज्यामध्ये स्वत:ला भाजप नेता म्हणवून घेणाऱ्या श्रीकांत त्यागीने महिलेशी गैरवर्तन केले आणि शिवीगाळ केली. सोसायटीतील रहिवाशांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. यानंतर सगळ्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांनीही या प्रकरणाची दखल घेतली. यासोबतच भाजपच्या काही नेत्यांनी ट्विट करून त्यागी यांच्यावर कारवाई करण्याबाबत चर्चा केली. त्यावर कारवाई करत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर या प्रकरणातील श्रीकांत त्यागी हा फरार असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
अवैध बांधकामावर चालवला बुलडोझर खासदारांनी पीडितेची भेट घेतली -भाजप खासदार महेश शर्मा यांनी शनिवारी नोएडातील ओमॅक्स सोसायटीत पोहोचलेल्या पीडित महिलेची भेट घेतली. पीडित महिलेने संपूर्ण घटना खासदार महेश शर्मा यांना सांगितली. दरम्यान, महेश शर्मा यांनी लोकांशी संवाद साधताना नोएडा पोलिस त्यागीला लवकरच अटक करतील, असे आश्वासन दिले.
हेही वाचा -Abdul Sattar in trouble : शिंदे गटाचे अब्दुल सत्तार अडचणीत? दोन्ही मुलींची घोटाळ्यातील टीईटी प्रमाणपत्रे रद्द