अलवर ( राजस्थान ) :अलवरमधील राजगड येथे मास्टर प्लॅन अंतर्गत दोनशे तीनशे वर्षे जुनी तीन मंदिरे पाडण्यात आली ( Bulldozer on 3 temples in Rajgarh Of Alwar ) आहेत. याप्रकरणी हिंदू संघटनांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. मात्र, अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. मास्टरप्लॅन अंतर्गत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत देवतांच्या मूर्तींची नासधूस केल्याने लोक संतप्त आणि अस्वस्थ झाले ( Master Plan Bulldozer In Rajasthan ) आहेत. याविरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांना पोलिसांनी बळजबरीने घटनास्थळावरून हटवले.
दंगल भडकवण्यासाठी मंदिरे पाडण्याची मोहीम : मंदिरे पाडण्याची मोहीम चर्चेचा विषय बनली आहे. 17 एप्रिलपासून राजगडमध्ये अशी प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. आपला निषेध व्यक्त करत हिंदू संघटनांनी राजगडचे आमदार जोहरीलाल मीना, एसडीएम केशव कुमार मीणा आणि नगरपालिकेचे सीईओ बनवारीलाल मीणा यांच्यावर कटाचा आरोप केला आहे. दंगल भडकवण्यासाठी अशी मोहीम चालवली जात असल्याचे त्यांचे मत आहे. लोकांचे म्हणणे आहे की, त्यांनी राजगड पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे, परंतु अद्यापपर्यंत पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवलेला नाही. राजकीय प्रभावामुळे पोलीस हे संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत.