महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

MP Accident Death : लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घाला, मध्य प्रदेशात मिनी ट्रक नदीत उलटून 12 नागरिकांचा मृत्यू - पीडितांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत

दतिया येथील बुहारा नदीत मिनी ट्रक उलटून झालेल्या अपघातात 12 वऱ्हाड्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना दुर्साडा पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली आहे.

Truck Overturned in Buhara River
घटनास्थळावर पडलेला मिनी ट्रक

By

Published : Jun 28, 2023, 9:55 AM IST

Updated : Jun 28, 2023, 2:25 PM IST

भोपाळ : भरधाव मिनी ट्रक बुहारा नदीत उलटून 12 नागरिकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना दतिया जिल्ह्यातील दुर्साडा पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली आहे. या घटनेत तीन डझनहून अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. जखमी नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्तळी पोलीस अधीक्षक प्रदीप शर्मा दाखल झाले असून त्यांनी घटनेचा आडजावा घेतला आहे.

मध्य प्रदेशात मिनी ट्रक नदीत उलटून 12 नागरिकांचा मृत्यू

पुलावरून अनियंत्रित होऊन ट्रक उलटला :मिनी ट्रकमध्ये बसलेले नागरिक लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी ग्वाल्हेरच्या बिल्हेटी गावातून टिकमगडहून जटाराकडे जात होते. त्यामुळे बुहारा गावाजवळील बांधकाम सुरू असलेल्या पुलावरून अनियंत्रित होऊन ट्रक उलटला. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाने बचावकार्य सुरू केले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळावर लुरू असलेले बाचावकार्य

सगळे नागरिक वधू पक्षाचे वऱ्हाडी :अपघातग्रस्त नागरिक हे बिल्हेटी गावातून नवरीला घेऊन डटाराकडे जात होते. नवरीही त्यांच्या सोबत जात असल्याने या नागरिकांमध्ये आनंदाचा उत्साह होता. मात्र बुहारा गावाजवळ बांधण्यात आलेल्या पुलावरुन हा मिनी ट्रक नदीत कोसळल्याने तब्बल 12 नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांचा आनंद शोकसागरात बदलून गेला. घटनास्थळावरील आक्रोश आणि रडण्याच्या आवाजाने हृद पिळवटून जात होते.

अपघातग्रस्त महिला

५ जणांचे मृतदेह काढले बाहेर :अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे. बुहारा गावाजवळ बांधण्यात आलेल्या पुलामुळे मिनी ट्रकला रॅम्प बनवून नदीतून बाहेर काढले जात आहे. ट्रक अनियंत्रित होऊन नदीत पडल्यामुळे 12 नागरिकांचा मृत्यू झाला. यातील पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. प्राथमिक माहितीच्या आधारे या मिनी ट्रकमध्ये 50 हून अधिक वऱ्हाडी प्रवास करत होते. मृतांमध्ये 3 मुले, एक वृद्ध महिला आणि एका तरुणाचा मृतदेह सापडला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी व्यक्त केला शोक :गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अपघातानंतर तातडीने अधिकाऱ्यांशी चर्चा करून बचाव कार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या. पीडितांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना गृहमंत्र्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा -

  1. मध्यप्रदेश : भीषण कार अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू
  2. मध्यप्रदेश : कंटेनर व तवेराच्या अपघातात नाशिकमधील चौघांचा मृत्यू
  3. मध्यप्रदेश : पिकअपच्या भीषण अपघातात ११ जण ठार
Last Updated : Jun 28, 2023, 2:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details