कैमूर (बिहार) -बिहारच्या कैमूरमधील चैनपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सरैया जंगलात चरत असताना एका म्हशीने चुकून बॉम्ब खाल्ला (Buffalo Ate Bomb in Kaimur) या घटनेपासून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी एकही डॉक्टर नसल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत.
चरत असाताना म्हशीच्या तोंडात फुटला बॉम्ब; रुग्णालयात उपचार सुरू - bomb exploded in mouth of buffalo in Kaimur
कैमूर येथे गवत खायला गेलेल्या म्हशीच्या तोंडात चुकून बॉम्ब गेला. या घटनेपासून म्हशीची प्रकृती चिंताजनक आहे. ज्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेतील पीडित म्हशीच्या मालकाने चैनपूर पोलीस ठाण्यात अर्ज देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेच्या संदर्भात असे म्हटले जाते की, चैनपूरच्या सरैया गावातील चतुरगुण बिंद हे आपल्या म्हशीला चरण्यासाठी जंगलात घेऊन गेले होते. याच जंगलात माफियांनी वन्यप्राण्याला मारण्यासाठी अनेक ठिकाणी बॉम्ब ठेवले होते. दरम्यान, जंगलात चरण्यासाठी गेलेल्या म्हशीच्या तोंडात हा बॉम्ब आल्याने स्फोट झाला. त्यानंतर मोठी जखम झाली.
म्हशीची प्रकृती बिघडल्याचे पाहून तीला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. यावर पशुपालकांनी योग्य ती कारवाई करून न्याय देण्याची मागणी केली आहे.