हैदराबाद :ज्योतिष्य शास्त्रानुसार बुध हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. आजपासून बुध कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्याचवेळी शनि आणि सूर्य आधीच कुंभ राशीमध्ये विराजमान आहेत. अशा स्थितीत सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य योग तयार होत आहे. याला राजयोग असेही म्हणतात. हा राजयोग अनेक लोकांसाठी अत्यंत फलदायी आहे.
बुध सूर्याशी करणार युती :आज बुध सूर्याशी युती करणार आहे. ही युती १५ मार्चपर्यंत राहणार असल्याचे राशीभविष्य तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. ज्योतिष्य शास्त्रानुसार ग्रहांच्या युतीने तयार होणारा बुधादित्य योग काही राशींसाठी खास असणार आहे. कुल्लूचे पंडित राजकुमार शर्मा यांनी 3 राशीच्या लोकांना याचा खूप फायदा होईल असे सांगतात. 15 मार्चनंतर सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे आजपासून कुंभ राशीत तयार होणारा बुद्धादित्य योग सर्व राशींवर प्रभाव टाकेल. परंतु तीन राशी अशा आहेत, ज्यांना या युतीने शुभ परिणाम मिळणार असल्याचेही पंडित शर्मा यांनी सांगितले. बुधादित्य योग कोणत्या राशीसाठी चांगला आहे, त्याची कोणत्या राशीवर वक्रदृष्टी राहणार आहे, यासाठी वाचा ईटीव्ही भारतवरील ही खास माहिती.
काय आहे बुधादित्य योग :१ फेब्रुवारीला बुध कुंभ राशीत प्रवेश करेल, त्यामुळे बुधादित्य योग तयार होत आहे. बुध 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.55 वाजता कुंभ राशीत प्रवेश करेल. जेथे शनि आणि सूर्य आधीच विराजमान आहेत. तेथे सूर्य आणि शनि पिता आणि पुत्र असल्याचे संबोधले जाते. त्यामुळे बुध आणि सूर्य म्हणजेच आदित्य एकाच राशीत येण्याला बुधादित्य योग म्हणतात. याचा प्रभाव सगळ्याच 12 राशींवर पडणार आहे. तर काही राशींसाठी हा योग नोकरी बढतीची संधी घेऊन येणार असल्याचे ज्योतिष्य शास्त्रानुसार सांगितले जाते. तर व्यवसायातही चांगली बातमी बुधादित्य योग घेऊन येणार आहे.
कसा असेल राशींवर बुधादित्य योगाचा प्रभाव :
- मेष राशीवर बुधादित्य योगाचा प्रभाव.
मेष राशीच्या व्यक्तीसाठी बुधादित्य योग सामान्य असेल. मात्र तरीही त्यांच्या मान सन्मानात वृद्धी होणार असल्याचे दिसून येत आहे.
- वृषभ राशीवर बुधादित्य योगाचा प्रभाव.
बुधादित्य योगाचा वृषभ राशीला सर्वाधिक लाभ मिळणार आहे. नोकरीत बढतीचे योग आहेत. त्यासह धनलाभही होणार आहे. व्यवसायात भागीदारी असेल, तर त्यातही यश येणार असल्याचे दिसून येत आहे. पैशांची बचत आणि गुंतवणुकीतही लाभ होणार असल्याचे वर्तवण्यात येत आहे.
- मिथुन राशीवर बुधादित्य योगाचा प्रभाव.
मिथून राशीच्या व्यक्तीची अडलेली सगळी कामे बुधादित्य योगामुळे मार्गी लागणार आहेत. त्यासह नवीन कार्याची सुरुवातही या राशीच्या व्यक्तींना करण्यास अनुकूल काळ आहे.
- बुधादित्य योगाचा कर्क राषीवर प्रभाव.