बडगाम -जम्मू-काश्मीमध्ये आतंकवादी सातत्याने हल्ला करत असतात. त्यांच्या निशाणावर नेहमी सामान्य नागरिक राहतात. त्यातच आता बडगाम जिल्ह्यातील चदूरा भागात दहशतवाद्यांनी तहसील कार्यालयावर हल्ला केला ( Budgam Terrorist Attack ) आहे. या हल्ल्यात एक कर्मचारी जखमी झाला ( Tehsildar office employee Injures Terrorist Attack ) आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चदूरा भागात संशयित दहहशतवाद्यांनी तहसील कार्यालयावर हल्ला केला. या हल्ल्यात कार्यालयातील कर्मचारी जखमी झाला आहे. या कर्मचाऱ्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.