महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

BSF Shot Pakistani Civilian : जवानाकडून कर्तव्य आणि माणुसकीही! घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकावर केले 'उपचार'

राजस्थानच्या श्रीगंगानगरजवळील भारत-पाक सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला शनिवारी बीएसएफ जवानांनी गोळीबार करून जखमी ( Pakistani citizen Attempt to enter India ) केले. चौकशीनंतर जखमी पाकिस्तानी नागरिकाला पाक रेंजर्सच्या ताब्यात देण्यात ( BSF Shot Pakistani Civilian ) आले.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Nov 27, 2022, 9:35 AM IST

जयपूर ( राजस्थान ) :भारतीय जवान हे नेहमीच कर्तव्याबरोबर माणुसकीचे दर्शन घडवितात. असाच एक प्रसंग सीमेवर घडला आहे. घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकावर जवानाने गोळीबार केला. मात्र, जखमी झालेल्या या नागरिकाकडे काही संशयास्पद न आढळल्याने त्याच्या उपचार करण्यात आले. त्याला परत पाकिस्तानात पाठविण्यात आले आहे.

पाकिस्तान सातत्याने भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. सुदैवाने बीएसएफच्या सतर्कतेमुळे त्यांचे मनसुबे रोखले जात आहेत. शनिवारी दुपारी पाकिस्तानी नागरिक (Pakistani citizen Attempt to enter India ) दुपारी भारताच्या सीमेत आला. पाकिस्तानी नागरिकाने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रत्यूत्तर देण्यासाठी बीएसएफ जवानांनी गोळीबार केला. या चकमकीत त्याच्या कमरेच्या खाली गोळी ( BSF Shot Pakistani Civilian ) लागली.पाकिस्तीना नागरिक जखमी झाला.

श्रीकरणपूर येथून घूसण्याचा प्रयत्न : मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी नागरिक श्रीकरणपूर येथील भारत-पाक सीमेवरून भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत ( Infiltration attempt from Srikaranpur ) होता. मात्र सीमेवर सुरू असलेल्या हालचाली पाहून बीएसएफ जवान सतर्क झाले. त्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तो व्यक्ती थांबला नाही. अशा स्थितीत बीएसएफ जवानांनी त्याच्या कमरेच्या खाली गोळी ( Pakistani civilians injured in BSF firing ) मारली. त्यामुळे तो जखमी होऊन खाली पडला. यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

पाकिस्तानी नागरिकाकडे उर्दू ओळखपत्र : या पाकिस्तानी नागरिकाकडे उर्दू ओळखपत्र सापडले ( Pakistani citizen Urdu identity card ) आहे. त्यावर त्याचे नाव सफदर हुसेन असे आहे. तो बहावलनगर येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. बीएसएफ जवानांना चौकशीत काहीही संशयास्पद आढळले नाही, त्यांनी पाकिस्तानी रेंजर्सशी बोलून त्याला पाकिस्तानच्या ताब्यात दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details