महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काश्मिरात बीएसएफ जवानाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या - बीएसएफ जवानाची आत्महत्या

जम्मू काश्मिरात सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. पुंछ जिल्ह्यात ही घटना घडली.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Dec 27, 2020, 10:36 PM IST

श्रीनगर - जम्मू काश्मिरात सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने (बीएसएफ) स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. पुंछ जिल्ह्यात ही घटना घडली. कॉन्स्टेबल पी. के दास असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

पी. के दास हा १६८ व्या बटालीयनमध्ये काश्मिरात तैनात होता. मेंढर सेक्टररमधील उचड कॅम्पमध्ये सर्व्हिस रिव्हॉलवरमधून गोळी झाडून जवानाने आत्महत्या केली. गंभीर अवस्थेत त्यांना सब डिस्ट्रिक्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनतर उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details