महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

BSF Jawan Raped On Boy : तरुणावर बीएसएफ जवानाचा लैंगिक अत्याचार, आधी पाजलं मद्य, मग झाडीत नेऊन केलं कुकृत्य - पीडित तरुणावर अत्याचार

BSF Jawan Raped On Boy : सैनिकी चौक्यावर दूध पुरवणाऱ्या एका तरुणावर सीमा सुरक्षा दलातील जवानानं लैंगिक अत्याचार केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या तरुणाला नराधम जवानानं मद्य पाजून अत्याचार केल्याचा आरोप पीडित तरुणानं केला आहे. न्यायालयाच्या आदेशानं या जवानाविरोधात हिंदुमलकोट पोलीस ठाण्यात भादंवी कलम 377, 365 आणि 120 बी नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार यांनी दिली.

BSF Jawan Raped On Boy
संग्रहित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2023, 10:14 AM IST

जयपूरBSF Jawan Raped On Boy :सीमा सुरक्षा दलाच्या जवानानं एका तरुणाला मद्य पाजून लैंगिक अत्याचार केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना श्रीगंगानगरमधील सीमावर्ती भागात घडली आहे. या तरुणावर अत्याचार (Rape Case ) केल्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनं त्याचा अश्लिल व्हिडिओ बनवल्याचा आरोपही या पीडित तरुणानं आपल्या तक्रारीत केला आहे. या कुकृत्यात जवानाच्या भावासह इतर दोन तरुणानीही जवानाला मदत केल्याचा आरोप या पीडित तरुणानं केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी या जवानावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार यांनी दिली आहे.

हिंदुमलकोट पोलीस ठाणे

सीमा सुरक्षा दलातील जवानानं एका तरुणावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी हिंदूमलकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानं सीमा सुरक्षा दलातील जवानावर भादंवी कलम 377, 365 आणि 120 बी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदुमलकोट पोलिसांनी बीएसएफ बटालियनकडून आरोपी जवानाची माहिती मागवली आहे - राजकुमार, पोलीस निरीक्षक, हिंदूमलकोट पोलीस ठाणे, श्रीगंगानगर

जवानांना दूध पुरवत होता तरुण :श्रीगंगानगर जिल्ह्यातील एका गावात पीडित तरुण राहणारा आहे. तो सीमावर्ती भागातील चौकीवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना दूध पुरवण्याचं काम करतो. सीमा सुरक्षा दलातील जवानांना दूध पोहोचवून तो आपला उदरनिर्वाह करत आहे. त्यामुळे सीमा सुरक्षा दलातील जवानांसोबत त्याची ओळख होती. सैन्यातील चौक्यांवर हा पीडित तरुण दूध पोहोचवून देत असे.

झुडूपात ओढत नेऊन केलं कुकर्म :पीडित तरुण 29 मार्चला जवानांना दूध घेऊन जाताना सीमा सुरक्षा दलातील जवानानं त्याला वाटेत अडवलं. या तरुणाला नराधम जवानानं रस्त्यातील झुडूपात ओढत नेऊन त्याला मद्य पाजलं. मद्य पाजल्यानंतर या नराधम जवानानं तरुणावर कुकूर्म केलं. त्यामुळे हा पीडित तरुण प्रचंड हादरला. मात्र जवानानं त्याचा अश्लिल व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी दिल्यानं त्यानं याबाबत कोणाला काहीच सांगितलं नसल्याची माहिती त्यानं पोलिसांना दिल्याचं पोलीस निरीक्षक राजकुमार यांनी सांगितलं.

दिल्लीत बोलावून केला अत्याचार :पीडित तरुणावर अत्याचार केल्याचा व्हिडिओ नराधम जवानानं काढला होता. तो व्हायरल करण्याची धमकी देऊन जवानानं त्याला 4 जूनला दिल्लीत बोलावलं होतं. त्यामुळे तरुण दिल्लीत गेल्यावरही त्याच्यावर अत्याचार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दिल्लीत बोलावून अत्याचार केल्यानंतर नराधमानं त्याला धमक्या दिल्यानं तो प्रचंड घाबरला होता. त्यामुळे त्यानं उशीरा तक्रार करण्यास गेल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं.

न्यायालयाच्या आदेशानं झाला गुन्हा दाखल :अत्याचारामुळे हादरलेल्या पीडित तरुणानं न्यायालयात धाव घेतल्याची माहिती या घटनेतील तपास अधिकाऱ्यानं दिली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपींविरुद्ध गुन्हा कलम 377, 365 आणि 120 बी नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचं तपास अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. हिंदुमलकोट पोलिसांनी बीएसएफ बटालियनकडून आरोपी जवानाची माहिती मागवली आहे. त्यामुळे तपास अधिक वेगानं करता येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. Kopardi Rape Case: कोपर्डी बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीची कारागृहात आत्महत्या; आरोपी मानसिक रुग्ण असल्याची प्रशासनाची माहिती
  2. Model Rape Case Mumbai : महिला मॉडेलसोबत 'एनआरआय' मॉडेलचा लव-सेक्स-धोका; अत्याचाराचा अतिरेक अन् पोलिसात तक्रार

ABOUT THE AUTHOR

...view details