महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Drugs Smuggling in Jammu : भारतीय लष्कराने उधळला जम्मूमध्ये अमली पदार्थ तस्करीचा डाव, एका पाकिस्तानी तस्कराला धाडले यमसदनी - अमली पदार्थ तस्कर

भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका पाकिस्तानच्या तस्कराला ठार केले आहे. हा तस्कर रामगड सेक्टरमधील एसएमपुरा पोस्टजवळ संशयित हालचाल करताना दिसून आल्यानंतर भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला थांबण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्याने न ऐकल्याने सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबार केला.

Drugs Smuggling in Jammu
पकडण्यात आलेले अमली पदार्थ

By

Published : Jul 25, 2023, 11:17 AM IST

जम्मू : सीमेपलिकडून भारतात अमली पदार्थाची तस्करी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न भारतीय लष्करी जवानांनी हाणून पाडला आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी तस्करी करणाऱ्या पाकिस्तानच्या तस्कराला सांबा सीमेवर गोळ्या घालून ठार करण्यात यश मिळवल्याची माहिती भारतीय लष्कराच्या प्रवक्त्याने मंगळवारी दिली आहे. मारल्या गेलेल्या तस्कराच्या ताब्यातून चार किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहितीही या प्रवक्त्याने दिली आहे.

रामगढ सीमा भागातून अमली पदार्थाची तस्करी :भारत पाकिस्तान सीमेवरील रामगड सीमा परिसरात दहशतवादी अमली पदार्थाची तस्करी करत असल्याचे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या निदर्शनास आले होते. यावेळी जवांनानी या पाकिस्तानी तस्कराला सूचना देत थांबण्याचे आदेश दिले. मात्र पाकिस्तानी तस्कराने लष्करी जवानांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करुन सीमेपार घुसखोरी सुरुच ठेवल्याने जवानांनी या तस्करावर गोळीबार केला. भारतीय लष्करी जवानांनी गोळीबार करत या पाकिस्तानी तस्कराला यमसदनी धाडण्यात यश मिळवले.

पाकिस्तानी तस्कराजवळ आढळले 4 पाकिटे :भारतीय लष्करी दलाच्या जवानांनी ठार केलेल्या पाकिस्तानी तस्कराजवळ प्रत्येकी एक किलो वजनाचे अमली पदार्थाचे चार पाकिटे आढळून आली आहेत. या परिसरात भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांकडून झाडाझडती घेतली जात आहे. हा पाकिस्तानी अमली पदार्थ तस्कर कोणाला ही अमली पदार्थ देणार होता, याचा शोध घेण्यात येत आहे.

एसएम पुरा पोस्टजवळ संशयास्पद हालचाल :सोमवारी मध्यरात्री रामगड सेक्टरमधील एसएमपुरा पोस्टजवळ संशयित दहशतवाद्याची हालचाल भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांना दिसून आली होती. त्यामुळे भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी या संशयित घुसखोराला वारंवार सूचना देऊनही त्याने आपली हालचाल सुरुच ठेवल्याने सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबार केला. या गोळीबारात एका पाकिस्तानी अमली पदार्थ तस्कराला ठार करण्यात यश आल्याची माहिती भारतीय लष्कराच्या प्रवक्त्याने दिली आहे. या पाकिस्तानी लष्कराची अद्यापही ओळख पटली नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा -

  1. Terrorists killed in Poonch: सुरक्षा दलाकडून मोठी कामगिरी! चार दहशतवाद्यांचा खात्मा
  2. Terrorist killed in JK: घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, सुरक्षा दलाकडून नियंत्रण रेषेवर दोन दहशतवाद्यांचा खात्मा

ABOUT THE AUTHOR

...view details