महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Brutal Murder in Delhi : दिल्लीत तरुणीचा निर्घृण खून, नराधम उत्तर प्रदेशातील बुलंदशरहमधून जेरबंद - दिल्लीत तरुणीचा निर्घृण खून

दिल्लीच्या शाहबाद परिसरातील एका तरुणीवर नराधमाने तब्बल 21 चाकूचे वार केल्याने खळबळ उडाली. या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला असून नराधमाचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र हा हल्ला कशामुळे करण्यात आला याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झाली नाही.

Brutal Murder in Delhi
संग्रहित छायाचित्र

By

Published : May 29, 2023, 1:53 PM IST

Updated : May 29, 2023, 4:03 PM IST

दिल्लीत तरुणीचा निर्घृण खून

दिल्ली : उत्तर पश्चिम दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात रविवारी रात्री एका अल्पवयीन मुलीची चाकूने 21 वार करून हत्या करण्यात आली. साक्षी असे या तरुणीचे नाव आहे. ती शाहबाद डेअरीच्या ई ब्लॉकमध्ये राहत होती. ती तिची मैत्रिण भावनासोबत बर्थडे पार्टीला जाणार होती. भावनाला बोलवायला ती त्याच्या घरी आली होती. भावना घरातून बाहेर पडेपर्यंत साक्षी भावनाच्या घराबाहेर उभी होती.

तरुणाने केले 21 चाकूचे वार :घराबाहेर उभी असतानातेवढ्यात एक तरुण आला आणि साक्षीशी बोलू लागला. कशाचा तरी राग आल्याने त्याने साक्षीवर चाकूने हल्ला केला. यानंतर त्याने दगडाने वार केले. अनेक वार झाल्याने साक्षी रस्त्यावर पडली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून साक्षीला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी साक्षी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

तरुणीचा खून एकतर्फी प्रेमातून केल्याचा संशय :दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात तरुणीवर तब्बल 21 वेळा चाकूने वार करुन खून केल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. या माथेफिरुने चाकुने वार केल्यानंतर साक्षीवर दगडानेही हल्ला केला. त्यामुळे साक्षी या तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. साक्षीला रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दिल्लीत तरुणीवर इतक्या निर्घृणपणे चाकुने वार करुन संपवल्याने देशभरात खळबळ उडाली आहे.

तरुणीच्या खुनामुळे हादरली दिल्ली : दिल्लीत श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात अत्यंत ठंड डोक्याने खून झाल्याचे उघड झाले होते. मात्र आज नराधमाने साक्षी या तरुणीवर अत्यंत निर्घृणपणे हल्ला केला आहे. या हल्ल्यात माथेफिरू नराधमाने तब्बल 21 वेळा तरुणीवर वार केले आहेत. त्यानंतर या नराधमाने साक्षीवर दगडानेही हल्ला केला आहे. तरुणीचा भरदिवसा खून झाल्याने दिल्लीकर नागरिक हादरले.

हेही वाचा -

  1. Satara Crime : एटीएममध्ये छेडछाड करून ३ कोटींची फसवणूक; उत्तर प्रदेशातील चौघांना अटक
  2. वाळू माफियांची मुजोरी; जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर चालवला टिप्पर, घटनेत जिल्हाधिकाऱ्यांचा बॉडीगार्ड जखमी
  3. Spanish Woman Molesting Case: स्पॅनिश पर्यटक महिलेचा विनयभंग करणाऱ्या मॅनेजरला दोन वर्षांचा कारावास
Last Updated : May 29, 2023, 4:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details