मलप्पुरम (केरळ) -20 नोव्हेंबर 1921. केरळच्या विविध भागांत जमीनदार आणि ब्रिटिशांविरोधात तीव्र आंदोलने सुरू होती. केरळच्या उत्तर भागात मलबार विद्रोहाविरोधात ब्रिटिश सरकारने दडपशाही केल्यानंतर आंदोलने आणखी तीव्र झाली. या आंदोलनात ज्यांना अटक करण्यात आली त्यांना केरळच्या बाहेर हलवण्यात आले. कैद्यांची वाहतूक करण्यासाठी ब्रिटिशांनी बंद रेल्वे वॅगनचा वापर केला. 20 नोव्हेंबर 1921 रोजी ताब्यात घेतलेल्या 100 पेक्षा जास्त बंडखोरांना बंद मालवाहू वॅगनमधून तिरूर रेल्वे स्टेशनवरुन कर्नाटकच्या बेल्लारी येथील मध्यवर्ती कारागृहाच्या दिशेने पाठविण्यात आले. अटकेत असलेल्यांवर मलप्पुरम-पलक्कड जिल्हा सीमेवरील पुलमंथोल पूल पाडल्याचा आरोप होता.
मृतदेहांचा खच
वॅगनमध्ये हवा आणि प्रकाश जाण्यासाठीही जागा नव्हती. यामुळे आत बंद असलेल्या कैद्यांचा श्वास गुदमरू लागला आणि ते ओरडायला लागले. यानंतर पलक्कड जिल्ह्यातील शोरनूर आणि ओलावकोड येथे ट्रेन थांबविण्यात आली. मात्र ब्रिटिश लष्कराने वॅगन उघडण्यास नकार दिला. रेल्वे तामिळनाडूच्या पोतानूर स्थानकावर थांबली. कैद्यांचा आरडाओरडा सर्व रेल्वे स्थानकात यावेळी घुमत होता. इतिहासकारांनी या वॅगन दुर्घटनेचे वर्णन जालियनवाला बागसारखे भीषण हत्याकांड असे केले आहे. सत्तरहून अधिक कैद्यांनी श्वास घेण्यासाठी प्रयत्न करत प्राण सोडले. यात वाचलेल्या कैद्यांना ब्रिटिश सैन्याने रुग्णालयात आणि नंतर तुरुंगात नेण्यात आले. वॅगनच्या आतील भयानक दृश्याने ब्रिटिश सैन्यालाही धक्का बसला होता. रेल्वे अधिकाऱ्यांनी पोतन्नूरहून तिरूरला मृतदेहांनी भरलेली वॅगन परत करण्याचे निर्देश यानंतर दिले.
100 वर्षांनंतरही या क्रूर हत्याकांडाच्या आठवणी तिरूरमध्ये जाग्या आहेत. पोतनूर येथून वॅगनमध्ये परतलेल्या 44 लोकांचे मृतदेह तिरूर कोरंगत जुमा मशिद आणि 18 कोट जुमा मशिदीत पुरण्यात आले. तिरुरी अलिकुट्टीकडून ऐकलेल्या कथा तिरूरला अजूनही आठवतात. ज्यांनी त्या दिवशी दफन विधी पार पाडला. सैनिकांनी जणू कैद्यांची शिकार करून त्यांना पकडले होते. जेव्हा ते कोइम्बतूरला पोहोचले तेव्हा स्टेशन मास्तरने वॅगन उघडली. त्यांनी जे पाहिले ते अतिशय दयनीय दृश्य होते. बहुतांश कैदी मृत झाले होते आणि वाचलेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उरलेले मृतदेह त्याच वॅगनमध्ये परत तिरूरला पाठवण्यात आले. जेव्हा मृतदेह तिरूरला परतले, तेव्हा त्यांना ताब्यात घेण्यासाठी कोणी नव्हते. शेवटी एल्नाडूचे स्थानिक कम्मुकुट्टियाक्का आणि कैनिक्करा मम्मिहाजी यांनी ताब्यात घेतले. ठुम्बरी अलिकुट्टी यांनी ते मृतदेह आणले आणि त्यावर अत्यंविधी केला.