अहमदाबाद- बीआरटी बसने स्वतंत्र मार्गिका तोडून अकबरनगर पुलाच्या भिंतीला धडक झाल्याने शहरात अपघात झाला आहे. या अपघातात ५ जण जखमी झाले आहेत. या अपघातात बसचे दोन भागात तुकडे झाले आहेत.
अहमदाबाद: बीआरटीने लेन तोडून पुलाला दिली धडक; भीषण अपघातात ५ जखमी - बीआरटी बस अपघात
बीआरटी बससाठी स्वतंत्र मार्गिका असतात. मात्र, बसचे नियंत्रण सुटल्याने गुजरातमध्ये मोठा अपघात झाला आहे.

बीआरटी बस
भररस्त्यात अपघात झाल्याने बघ्यांची पुलावर गर्दी जमा झाली होती. अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे.
बीआरटीसाठी स्वतंत्र मार्गिका असताना अपघात झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
Last Updated : Dec 9, 2020, 4:10 PM IST