नांदेड :भारत राष्ट्र समितीची नांदेडात पहिली सभा झाल्यानंतर राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्यासाठी आर्थिक तरतूद केली. बीआरएसच्या कार्यकर्त्यांनी आगामी २२ मे ते २२ जून असे महिनाभर राज्यातील ५० हजार गावापर्यंत गेल्यास राज्य सरकार निश्चित ताळ्यावर येईल, असे आवाहन भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी केले. बीआरएसने विधानसभेच्या 288 जागांची तयारी सुरू केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच विकासाचे बीआरएस मॉडेल देशभर नेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
नांदेडात पार पडले दोन दिवशीय शिबीर :शुक्रवारी राज्यातील २८८ मतदार संघातील प्रमुखांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री केसीआर यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या चार महिन्यांत केसीआर यांचा शुक्रवारचा नांदेडातील तिसरा दौरा होता.
देशभरात तेलंगणा मॉडेलची चर्चा :देशभरात सध्या तेलंगणा मॉडेलची चर्चा होत आहे. मी येऊन गेल्यानंतर बजेटमध्ये लगेच राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची घोषणा केल्याचे केसीआर यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यभरातील जर प्रत्येक गावात बीआरएसचे तेलंगणा मॉडेल पोहोचले तर, राज्य सरकारची धावपळ उडेल. आपण ज्या लक्ष्याची सुरुवात करीत आहोत, ते साधारण लक्ष्य नाही. आपल्याला फक्त निवडणुकीसाठी राजकारण करायचे नाही, तर प्रत्येक शेतकऱ्याच्या, सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवायचा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
लवकरच पक्षाची कार्यालय करणार सुरू :तेलंगणाची महाराष्ट्राला एक हजार किमीची बॉर्डर आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात रोटी-बेटीचे व्यवहार होतात. एकमेकांना नातेवाईक दोन्ही राज्यात आहेत. त्यातून बऱ्याच गोष्टी माझ्या कानावर येतात. राज्यातील अनेक जिल्ह्यांना भेटीगाठी सुरू आहेत. लवकरच पक्षाची कार्यालये सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा -
- Karnataka CM Oath Ceremony : सिद्धरामय्या-शिवकुमार यांचा शपथविधी सोहळा ; 'या' बड्या नेत्यांची उपस्थिती राहणार, तयारी पूर्ण
- Child At King Charles Coronation : राजा चार्ल्सच्या राज्याभिषेकासाठी 'या' सात वर्षांच्या मुलाला बोलावले होते, जाणून घ्या काय आहे खास
- Bageshwar Baba Gujarat Visit : बागेश्वर बाबांच्या गुजरात दौऱ्यावरून वाद, माजी मुख्यमंत्री वाघेला म्हणाले - 'बाबा धर्माच्या नावाखाली..