नवी दिल्ली : दिल्ली दारू घोटाळाप्रकरणी तपास यंत्रणांच्या चौकशीत असलेल्या भारत राष्ट्र समितीच्या (BRS)आमदार कविता यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळालेला नाही. कविता यांनी सर्वोच्च न्यायालयात उद्या हजर राहण्यासाठी दिलेल्या समन्सला स्थगिती देण्याची विनंती केली होती. सर्वोच्च न्यायालयाने तसे करण्यास नकार दिला आहे. बुधवारी कविताच्या वकिलाने सुप्रीम कोर्टात सांगितले की, एक महिला असल्याने कविताची ईडीच्या कार्यालयात नाही तर तिच्या घरात चौकशी केली पाहिजे. ही मागणीही कोर्टाने मान्य केली नाही. त्यामुळे कवीता यांना आता हजर राहावे लागणार आहे.
24 मार्च रोजी करणार असल्याचे कोर्टाने म्हटले : सर्वोच्च न्यायालयात 24 मार्च रोजी या मुद्द्यावर सुनावणी होणार आहे. सुप्रिम कोर्ट या प्रकरणाची थेट सुनावणी करत होते. त्यांच्यासमोरील याचिकेत कविता १२ मार्चला ईडीसमोर हजर झाल्याचं म्हटलं होतं. आणि आता पुन्हा ED ने उद्या म्हणजेच 16 मार्चला समन्स बजावले आहे. ही चौकशी तूर्तास थांबवावी, अशी विनंती त्यांनी केली होती. मात्र, या प्रकरणाची सुनावणी 24 मार्च रोजी करणार असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.