चंदीगड : ब्रिटीश उच्चायुक्त अलेक्स एलिस बुधवारी जालियनवाला बागमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी जालियनवाला बाग येथे शहिदांना श्रद्धांजली वाहिली. जालियनवाला बाग हत्याकांड ही लाजिरवाणी घटना असल्याचे सांगत त्यांनी खेद व्यक्त केला.
ब्रिटीश उच्चायुक्त अलेक्स एलिस यांनी शहीदांना वाहिली श्रद्धांजली ब्रिटीश उच्चायुक्त अलेक्स एलिस आणि उप उच्चायुक्त कॅरोलिन रोवेट भारतात पोहोचले होते. यावेळी त्यांनी जालियनवाला बाग येथे शहिदांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, ब्रिटीश उच्चायुक्त अलेक्स एलिस यांनी १३ एप्रिल १९१९ चे हत्याकांड हे ब्रिटन आणि भारताच्या इतिहासातील "काळा दिवस" असल्याचे म्हटले आहे. व्हिजिटर बुकमध्येही त्यांनी आपल्या भावना लिहिल्या.
ब्रिटीश उच्चायुक्त अलेक्स एलिस यांनी शहीदांना वाहिली श्रद्धांजली त्यामध्ये त्यांनी लिहिले की, १३ एप्रिल १९१९ रोजी जालियनवाला बागेत जे घडले ते अत्यंत लज्जास्पद होते. त्यावेळी जे काही घडले ते अत्यंत दुःखद होते. त्याबद्दल आम्हाला खूप खेद वाटतो. ते पुढे म्हणाले की, हे हत्याकांड कधीही विसरता येणार नाही.
ब्रिटीश उच्चायुक्त अलेक्स एलिस यांनी शहीदांना वाहिली श्रद्धांजली तत्पूर्वी, यूकेच्या राजनयिकांनी त्यांच्या कुटुंबियांसमवेत श्री हरमंदिर साहिबला भेट दिली, जिथे SGPC चेअरमन हरजिंदर सिंग धामी यांनी त्यांना शीख शिष्टाचार आणि परंपरांची ओळख करून दिली.