महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Odisha Bridge Collapsed : ओडिशात बांधकाम अर्धवट झालेला पूल कोसळला, चार मुलांसह पाच जणांचा मृत्यू - रायगडा जिल्हा

ओडिशामधील रायगडा जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. रायगडा जिल्ह्यातील उपरसाजा गावात बांधकामाधीन पुलाचा भाग कोसळला. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. (Odisha Bridge Collapsed).

निर्माणाधीन पुलाचा भाग कोसळून पाच जणांचा मृत्यू
निर्माणाधीन पुलाचा भाग कोसळून पाच जणांचा मृत्यू

By

Published : Jul 31, 2023, 12:27 PM IST

Updated : Jul 31, 2023, 3:02 PM IST

ओडिशा:रायगडा जिल्ह्यात असलेल्या कल्याणसिंगपूर तालुक्यातील उपरसाजा गावात मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एका पुलाचे बांधकाम सुरू होते. सोमवारी सकाळी या पुलाचा काही भाग कोसळला. या घटनेत चार मुलांसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. (Odisha Bridge Collapsed).

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता : मिळालेल्या माहितीनुसार, ही मुले पुलाखाली अंघोळ करत होती. त्यावेळेस ही दुर्घटना घडली. अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही. बांधकाम सुरू असलेल्या पुलाखाली अनेक लोक अडकले असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही. त्यामुळे या घटनेतील मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. धक्कादायक म्हणजे, घटनास्थळी बऱ्याच काळापर्यंत कोणताही प्रशासकीय अधिकारी पोहचलेला नव्हता.

घटनेची चौकशी सुरू : बांधकामाधीन पुलाखाली मुले आंघोळ करत असताना हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर घटनास्थळी विदारक दृश्य पाहायला मिळाले. परिसरात संततधार पाऊस बरसत असूनही ग्रामस्थ मोठ्या संख्येने पोहोचले होते. अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे. मृतांची ओळख पटविण्याचे काम चालू आहे. अगदी थोड्या पावसानंतरच बांधकाम सुरू असलेला पूल कोसळल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.

या आधीही अशा घटना घडल्या आहेत : गेल्या मार्चमध्ये केंद्रपाड्यात एक बांधकाम सुरू असलेला खांब पडल्याची बातमी समोर आली होती. महिपालजवळील गोबरी नदीवरील बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला होता. या निकृष्ट कामाबद्दल स्थानिकांनी तक्रारी देखील केल्या होत्या. हा पूल 12 तासातच कोसळला होता. सुदैवाने या घटनेत कोणीही मारले गेले नाही. तर एप्रिल 2020 मध्ये, बालंगीरमध्ये पूल कोसळल्यामुळे 2 लोकांचा मृत्यू झाला होता. पटनागढमधील मुदलसर गावातील शुक्तेल नदीवरील पूल कोसळला होता. दोघेही मृतक मध्य प्रदेशातील रहिवासी होते.

हेही वाचा :

  1. Wall Collapse In Kolhapur : खासबाग मैदानाची संरक्षक भिंत कोसळून महिलेचा मृत्यू
  2. School Wall Collapsed : वर्ग सुरू असतानाच शाळेची भिंत कोसळली; परिसरात एकच गोंधळ
  3. Junagadh Building Collapsed : जुनागडमध्ये तीन मजली इमारत कोसळली, एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू
Last Updated : Jul 31, 2023, 3:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details