महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बोहल्यावर चढण्यापूर्वीच वधूच्या गळ्यात विजयाची माळ - पंचायत निवडणुक अपडेट्स

उत्तर प्रदेश येथील पंचायत निवडणुकीत एक नवरी विजयी झाली आहे. पुनम यांच्या लग्नाचे विधी चालु होते, त्याचवेळी बीडीसी पदासाठी निवडुन आल्याचे समजताच, त्या विजेता प्रमाणपत्र घेण्यासाठी मतमोजणी केंद्रावर पोहचल्या.

Breaking News

By

Published : May 3, 2021, 2:12 PM IST

रामपुर -उत्तर प्रदेश मधील रामपुर येथे लग्न सोहळा सुरु होता. या लग्नातील नवरीचा पंचायत निवडणुकीत विजय झाल्याचे समजताच, विजयी प्रमाणपत्र घेण्यासाठी थोडाही विलंब न करता नवरी थेट मतदान मोजणी केंद्रावरच पोहचली. 'देव जेव्हा देतो, तेव्हा भरभरुन देतो', याचे उत्तम उदाहरण हेच होय.

नवरी थेट मतमोजणी केंद्रातच पोहोचली

२ मे ला होत लग्न

मोहम्मदपुर येथील गंगासरन यांच्या मुलीचे २ मे ला लग्न होते. बरेली जनपद येथून वऱ्हाड आले होते. लग्नाच्या विधी सुरु होत्या. सगळीकडे आनंदीमय वातावरण होते. यात अजुन एका आनंदाच्या बातमीने भर पडली होती. लग्नातील वधू ६०१ मतांनी पंचायत समितीची निवडणुक जिंकली होती.

लग्नातुन थेट मतमोजणी केंद्रावर

निवडणुकीत विजयी झाल्याचे समजताच नवरी लग्नमंडपातून थेट मतमोजणी केंद्रावर पोहचली. नववधूचे कपडे व दागदागीने घालुन महिला मतमोजणी केंद्रावर बघुन लोक आश्चर्यचकीत झाले. परंतु, नववधू निवडणुक जिंकली आहे, असे समजताच शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला.

अगोदर विजयी प्रमाणपत्र नंतर वरमाला

'हा क्षण खुप आनंदाचा आहे, मी कधीच हा दिवस विसरणार नाही, लग्नाच्या सर्व विधी झाल्या आहेत. फक्त वरमाला बाकी आहे. आता प्रमाणपत्र घेतले आहे. घरी जाऊन दुप्पट आनंदाने लग्नसोहळा पार पाडू', असे नवर्निवाचीत बीडीसी म्हणाल्या आहेत.

हेही वाचा -फोन टॅपिंग प्रकरण : अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी रश्मी शुक्लांची उच्च न्यायालयात धाव

ABOUT THE AUTHOR

...view details