महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Telangana News : हुंड्याची वाढीव मागणी केल्यानंतर वधूने दिला लग्नास नकार, प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले - वधू

तेलंगणातील मेडचल मलकाजगिरी जिल्ह्यात एका वधूने लग्नास नकार दिल्याची घटना समोर आली आहे. वधूने दिलेला हुंडा पुरेसा नसल्याचे कारण देत, वराचे नातेवाईक अतिरिक्त हुंड्याची मागणी करत होते, त्यामुळे वधूने लग्नास नकार दिल्याचे कारण समजले आहे.

Telangana News
वधूने दिला लग्नास नकार

By

Published : Mar 10, 2023, 7:58 PM IST

हैदराबाद :कोणतेही लग्न रद्द होण्यामागे अनेक कारणे असतात आणि हुंडा हे त्यापैकी एक कारण आहे. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात अपुऱ्या हुंड्यामुळे मुलाच्या कुटुंबीयांकडून लग्न केले जात नाही. पण एका मुलीने स्वतः लग्नाला नकार दिल्याने हैदराबादमधील लग्न अनपेक्षितपणे थांबले. ही घटना मेडचल मलकाजगिरी जिल्ह्यातील घाटकेसर पोलीस ठाण्याची असल्याचे सांगण्यात येत आहे. लग्नासाठी आलेल्या नातेवाईकांनी लग्न सभागृहातच गोंधळ सुरू केला.

वधूने दिला लग्नास नकार :यादरम्यान वधूने वरासह इतर सर्वांना धक्कादायक बातमी दिली. ती म्हणाली की, तिला त्या मुलाशी लग्न करायचे नाही. या प्रकरणात वधूकडून वराच्या कुटुंबाला हुंडा द्यायचा होता, मात्र हुंड्याची मागणी जास्त असल्याने वधूने लग्नास नकार दिला. लग्नाला नकार दिल्यानंतर प्रकरण पंचायतीपर्यंत पोहोचले आणि तेथून हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेडचल मलकाजीगिरी जिल्ह्यातील पोचाराम नगरपालिकेच्या कॉलनीत राहणाऱ्या एका तरुणाचे खम्मम जिल्ह्यातील एका तरुणीशी लग्न ठरले होते.

मुलगी चढलीच नाही बोहल्यावर : मुलीच्या नातेवाईकांनी वडीलधाऱ्यांच्या उपस्थितीत हुंडा म्हणून दोन लाख रुपये वर पक्षाला देण्याचा करार दोन्ही कुटुंबांमध्ये झाला. हा विवाह सोहळा गुरुवारी ९ मार्च रोजी सायंकाळी निश्चित करण्यात आला होता. घाटकेसर येथील एका लग्न सभागृहात हा विवाहसोहळा पार पडणार होता. मुलाचे कुटुंबीय आणि नातेवाईक मुहूर्ताच्या आधी समारंभ मंडपात पोहोचले. मुहूर्ताची वेळ होऊनही मुलगी लग्न मंडपात पोहोचली नाही, तेव्हा मुलांनी विचारपूस केली.

प्रकरण पोहचले ठाण्यात :मुलाच्या कुटुंबासाठी हुंडा पुरेसा नसल्याची माहिती समोर आली, त्यानंतर त्यांनी जादा हुंड्याची मागणी केली आणि वधूला याची माहिती मिळाली. हे कळल्यानंतरच वधूने लग्नास नकार दिला. याप्रकरणी कोणालाच काही समजू शकले नाही, तेव्हा वराच्या नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधला. तक्रारीनंतर स्थानिक सीआयने वधूच्या नातेवाईकांना पोलिस ठाण्यात बोलावले.

पोलिसांचा समजावण्याचा प्रयत्न : यानंतर मुली आणि मुलाच्या नातेवाईकांमध्ये भांडण झाले. पोलिसांनी त्यांना फटकारले आणि दोन्ही कुटुंबीयांनी समेट करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर हे लग्न रद्द करण्यात आले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून; दोन्ही पक्षांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आजूबाजूच्या लोकांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या परिसरात पहिल्यांदाच काही कारणास्तव लग्नात अडथळे आल्याची घटना घडली आहे.

हेही वाचा : Satara Crime : कराड तालुक्यात महिलेची हत्या, चौकशीसाठी संशयित ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details