महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Home Theater Blast Case: 'त्या' होम थिएटर स्फोट प्रकरणात वधुचा प्रियकरच निघाला मास्टरमाईंड - लग्नघरात होम थिएटर स्फोट प्रकरण

कावर्धा येथील लग्नघरात होम थिएटर स्फोट प्रकरणात दोघांचा मृत्यू झाला होता. ही घटना सोमवारी घडली. याप्रकरणी कावर्धा पोलिसांनी मंगळवारी मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वधुचा प्रियकरच या स्फोटाचा मास्टरमाईंड असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Home Theater blast Case Kawardha
होम थिएटर बॉम्बस्फोट प्रकरण

By

Published : Apr 5, 2023, 7:14 AM IST

होम थिएटर बॉम्बस्फोट प्रकरण

कावर्धा :होम थिएटर बॉम्बस्फोट प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. कवर्धाचे एसपी लाल उमेंद सिंह यांनी या पत्रकार परिषदमध्ये मोठा खुलासा केला आहे. एसपींनी सांगितले की, होम थिएटर बॉम्बस्फोटाची घटना अत्यंत विचारपूर्वक नियोजनाअंतर्गत करण्यात आली होती. या कटात वधूच्या प्रियकराचा सहभाग आहे. या लग्नामुळे तो नाराज होता. त्यामुळेच त्याने हा हत्येचा कट रचला. वधूच्या प्रियकराने गुपचूप स्फोटके मंडपाजवळील होम थिएटर सोडली होती. पती महेंद्र आणि त्याच्या भावाने होम थिएटर सुरू करताच, स्फोट झाला आणि दोघांचा मृत्यू झाला. या घटनेत अन्य ५ जण जखमी झाले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काय आहे संपूर्ण घटना :आरोपी सरजू मरकम याचे तरुणीसोबत काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. लग्न निश्चित झाल्यानंतर मुलीला संबंध संपवायचे होते. आरोपी आधीच विवाहित आहे. तो दोन मुलांचा बाप आहे. लग्नाच्या आठवडाभरापूर्वी आरोपी सरजूचा तरुणीसोबत फोनवरून वाद झाला होता. मुलीने हा सगळा प्रकार तिच्या होणाऱ्या नवऱ्याला सांगितला. यावर तिच्या होणाऱ्या नवऱ्याने आरोपीला सुनावले होते. यामुळे आरोपी संतापला होता. त्याला बदला घ्यायचा होता.

अशाप्रकारे पोलीस पोहोचले आरोपीपर्यंत : घटनेनंतर पोलीस होम थिएटर प्रोव्हायडरचा शोध घेत होते. सर्वांनी वधू-वरांच्या बाजूने ही भेट दिल्याचो नाकारले होते. लग्नात झालेल्या व्हिडीओग्राफी आणि फोटोग्राफीवरून काहीच कळले नाही. आरोपी सरजूसोबत झालेल्या वादाची माहिती तरुणीने पोलिसांना दिली. सरजूने चौकशीदरम्यान पोलिसांची दिशाभूल केली. दरम्यान, होम थिएटरवर लिहिलेल्या दुकानाच्या नावाच्या आधारे पोलीस खासदार मंडईत पोहोचले. ऑनलाइन पेमेंटच्या आधारे पोलिसांनी पुन्हा सरजूला गाठून पोलीस ठाण्यात आणले. चौकशीत सरजूने आपला गुन्हा मान्य केला.

आरोपीने अशी योजना आखली होती :आरोपी सरजूने सांगितले की, तो एक इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक आहे. याचा फायदा घेत त्याने दीड किलो अमोनियम नायट्रेट आणि फटाके गनपावडर म्युझिक सिस्टीममध्ये ठेवून हे उपकरण तयार केले, जेणेकरून दोन्ही किंवा दोन्ही दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला पाहिजे. १ एप्रिलला तो थिएटर त्याने शांतपणे प्रेयसीच्या दारात ठेवून निघून गेला. 3 एप्रिल रोजी वराने घरातील होम थिएटर सुरू करताच एक स्फोट झाला. वराचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या भाऊ उपचारादरम्यान मृत्युमुखी पडला. जंगल रेंगाखार पोलीस स्टेशन क्षेत्रातील चमारी गावात घडलेल्या घटनेचा खुलासा करताना, एसपी लाल उमेंद सिंग यांनी आरोपीला अटक करणाऱ्या टीमला रोख बक्षीस जाहीर केले होते.

हेही वाचा : Blast in Car : श्रीनगरमध्ये कारमध्ये स्फोट, सुरक्षा यंत्रणा सतर्क

ABOUT THE AUTHOR

...view details