हैदराबाद: वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रायन लारा ( Great player Brian Lara ) याची शनिवारी 2016 च्या आयपीएल चॅम्पियन सनरायझर्स हैदराबादच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. लारा 2022 च्या आयपीएल हंगामात सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad ) संघाचा रणनीती सल्लागार आणि फलंदाजी प्रशिक्षक होता. लारा टॉम मूडीच्या ( SRH Ex Head Coach Tom Moody ) जागी सनरायझर्स हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. कारण मूडी यांचा कार्यकाळ संपला आहे.
कोणत्याही टी-20 संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून लाराचा हा पहिलाच अनुभव असेल. फ्रँचायझीने सोशल मीडियावर म्हटले आहे की, "क्रिकेट लिजंड ब्रायन लारा आगामी आयपीएल हंगामासाठी आमचे मुख्य प्रशिक्षक असतील."
मूडी आणि हैदराबाद (सनराईजर्स हैदराबाद) या दोघांनीही कराराचा पाठपुरावा न करण्याचा निर्णय घेतला. टॉम मूडी यांची अलीकडेच जानेवारी 2023 पासून संयुक्त अरब अमिराती ( UAE ) आयएलटी 20 ( ILT20 ) मध्ये डेझर्ट वाइपर्ससाठी क्रिकेट संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.