बंगळुरू - कर्नाटकमध्ये हिजाब परिधान करण्यावरून वाद सुरू आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब प्रकरणी याचिकांवर सुनावणी केली. न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांच्या एकल खंडपीठाने हिजाब प्रकरण वरिष्ठ खंडपीठाकडे वर्ग केले आहे.
उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या मुस्लीम विद्यार्थीनींना प्रवेश नाकारण्यात आल्यापासून या वादाला तोंड फुटले आहे. मुस्लिम विद्यार्थिंनींना शाळा किंवा कॉलेजमध्ये हिजाब घालण्याला विरोध केला जात आहे. कर्नाटकमध्ये अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबविरोधातील निदर्शने तीव्र झाली असून, त्याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हिजाबच्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व हायस्कूल आणि महाविद्यालये तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
एआयएमआयएम प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी विद्यार्थिनींना पाठिंबा दिला आहे. मुस्लिम मुलींना हिजाब घालण्यास मनाई करणे हे त्यांच्या घटनात्मक अधिकारांचे मूलभूत उल्लंघन आहे असे म्हटले आहे. तसेच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी महिलांना हवे ते परिधान करण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे, असे म्हटलं. 'बिकिनी असो, घुंगड असो, जीन्स असो किंवा हिजाब असो, तिने काय घालायचे हे ठरवण्याचा अधिकार फक्त तिचा आहे. हा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे. महिलांचा छळ करणे थांबवा.
हिजाब वादावर मलालाचेही ट्विट -