महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Air India Plane Skids Off Runway : जबलपूर डुमना विमानतळावर मोठा अपघात, एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून घसरले - मध्यप्रदेशात एअर इंडियाच्या विमानाचा अपघात

एअर इंडियाच्या विमानाचे 1 चाक चिखलात घुसल्यामुळे ही दुर्घटना झाली. या घटनेत विमानाचा लाईटही फुटला, सर्व प्रवासी सुखरूप आहेत. विमान दिल्ली-जबलपूर-बिलासपूर असे हे विमान जात असल्याचे सांगितले आहे. विमान दिल्लीहून जबलपूरला पोहोचले होते, अपघातात कोणीही जखमी झाले नाही. विमानतळ व्यवस्थापन या अपघाताची चौकशी करत आहे.

Air India Plane Skids Off Runway
जबलपूर डुमना विमानतळावर मोठा अपघात

By

Published : Mar 12, 2022, 3:13 PM IST

Updated : Mar 12, 2022, 4:14 PM IST

जबलपूर (मध्यप्रदेश) - दुमाना विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला ( Air India Plane Skids Off Runway ) आहे. एअर इंडियाचे विमान हे लँडिंग दरम्यान धावपट्टीवर घसरले आहे.

विमानात होते 55 प्रवाशी -

जबलपूर येथे अलायन्स एअर एटीआर-72 हे विमान दिल्लीहून सुमारे 55 प्रवाशांसह जबलपूर येथे धावपट्टीवर लॅंडिंग करत असताना घसरले. यातील सर्व प्रवासी हे सुरक्षित आहेत असे प्रशासनाने सांगितले आहे.

अपघाताची चौकशी होणार -

एअर इंडियाच्या विमानाचे 1 चाक चिखलात घुसल्यामुळे ही दुर्घटना झाली. या घटनेत विमानाचा लाईटही फुटला, सर्व प्रवासी सुखरूप आहेत. विमान दिल्ली-जबलपूर-बिलासपूर असे हे विमान जात असल्याचे सांगितले आहे. विमान दिल्लीहून जबलपूरला पोहोचले होते, अपघातात कोणीही जखमी झाले नाही. विमानतळ व्यवस्थापन या अपघाताची चौकशी करत आहे.

हेही वाचा -Ajit Pawar on Fuel Rate Deduction : पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच - अजित पवार

Last Updated : Mar 12, 2022, 4:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details