महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Breaking Live Page नीरा देवघर धरण ओव्हरफ्लो झाल्याने नीरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू - महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

Breaking news Maharashtra
Breaking news Maharashtra

By

Published : Aug 13, 2022, 8:34 AM IST

Updated : Aug 13, 2022, 4:12 PM IST

16:10 August 13

नीरा देवघर धरण ओव्हरफ्लो

14:07 August 13

सख्ख्या भावाने कुऱ्हाडीचा घाव घालून केला भावाचा खून

बारामती - शेतात जाणाऱ्या वाटेवर लाकडी ओंडके का टाकले अशी विचारणा केल्यावरून सख्ख्या भावाने कु-हाडीचा घाव घालून भावाचा खून केला. ही धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील मोढवे गावातील मोटेवस्तीत घडली.

13:39 August 13

कोल्हापुरात शिवसैनिकांची पोलिसांकडून धरपकड

कोल्हापुरात शिवसैनिकांची पोलिसांकडून धरपकड, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात करणार होते निदर्शने.

10:03 August 13

बांदामध्ये बोट उलटल्याची घटना घडल्यानंतर आणखी आठ मृतदेह बाहेर काढले

बांदामध्ये बोट उलटल्याची घटना घडल्यानंतर पोलीस आणि पाणबुड्यांनी आणखी आठ मृतदेह बाहेर काढले. आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया आणि शोध मोहीम सुरू आहे.

09:42 August 13

अमित शहा आणि त्यांची पत्नी सोनल शाह यांनी निवासस्थानी तिरंगा फडकवला

दिल्ली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांची पत्नी सोनल शाह यांनी आज हरघर तिरंगा मोहीम सुरू होताच त्यांच्या निवासस्थानी तिरंगा फडकवला.

09:31 August 13

शी जिनपिंग नोव्हेंबरमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन यांना भेटण्याची योजना

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग नोव्हेंबरमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन यांना भेटण्याची योजना आखत आहेत. त्यांची ही भेट वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

09:08 August 13

हरघर तिरंगा मुंबईत सायकल रॅली

मुंबई - SBI चे अध्यक्ष दिनेश खारा यांनी हरघर तिरंगा सायकल रॅलीला झेंडा दाखवला. 200 हून अधिक लोक यामध्ये सहभागी होत आहेत. आपण स्वातंत्र्याची ७५ वे वर्ष साजरे करत आहोत. याद्वारे आमचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचेल अशी आम्हाला आशा आहे असे दिनेश खारा यांनी यावेळी सांगितले

08:22 August 13

Breaking news मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पूरस्थितीचा आढावा घेणार

शिंदे फडणवीस दौरा

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर व सांगली जिल्हा दौऱ्यावर जात आहेत. त्यांचे सकाळी साडेअकराला कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. तेथून ते दुपारी एकला सांगलीला आमदार अनिल बाबर यांच्या निवासस्थानी जातील. दुपारी तीनला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पूरपरिस्थितीचा आढावा घेतील आणि त्यानंतर चारला कोल्हापूर विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण करतील.

08:19 August 13

Breaking news Maharashtra live page 13 Aug 2022

आजपासून देशभर हरघर तिरंगा मोहिमेची सुरुवात होत आहे. देशभर घरोघरी तिरंगा उभारण्याची ही मोहीम आहे. केंद्रातील मोदी सरकारने देशभक्तीने ओतपोत भरलेल्या या मोहिमेचे आयोजन केले आहे.

Last Updated : Aug 13, 2022, 4:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details