महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Breaking News Live : मेळघाटातील पाचडोंगरी येथील मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करा - मुख्यमंत्री शिंदे - महाराष्ट्र ताज्या घडामोडी

Breaking news
Breaking news

By

Published : Jul 9, 2022, 7:30 AM IST

Updated : Jul 9, 2022, 6:14 PM IST

18:12 July 09

मेळघाटातील पाचडोंगरी येथील मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करा - मुख्यमंत्री शिंदे

अमरावती:मेळघाटातील पाचडोंगरी येथे दुषित पाणी पिल्यामुळे आजारी पडलेल्या नागरिकांना तातडीने चांगले उपचार मिळवून द्यावेत. आवश्यक असल्यास खासगी रूग्णालयात दाखल करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमरावतीच्या जिल्हाधिका-यांना दूरध्वनीद्वारे दिले. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत मिळवून दिली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

16:28 July 09

आमची नैसर्गिक युती पुन्हा जिवंत झाली - देवेंद्र फडणवीस

माझ्या पक्षाने मला आधी मुख्यमंत्री केले, आता पक्षाच्या निर्णयाचे पालन केले आहे. एकनाथ शिंदे आमचे नेते आणि मुख्यमंत्री आहेत. आम्ही त्याच्या हाताखाली काम करू. अन्याय दूर झाला आणि आमची नैसर्गिक युती पुन्हा जिवंत झाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

12:54 July 09

एकनाथ शिंदे, फडणवीस यांनी घेतली राष्ट्रपती कोविंद यांची भेट

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत तेथे ते भाजपच्या वरीष्ठ मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेत आहेत. यात त्यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन चर्चा केली.

12:14 July 09

हिंगोलीतील पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

नवी दिल्ली - हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेलेली आहेत. नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण कुरुंदा गाव पाण्याखाली गेले आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच त्यांनी स्वतः दिल्लीवरून हिंगोलीचे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी स्वतः पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणाची राहाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.

11:38 July 09

नगरपरिषदेच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये घ्याव्या - भाजप

नागपूर - नगरपरिषदेच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये घ्याव्या अशी मागणी भाजपकडून निवडणूक आयोगाला करणार आहे. भाजप नेते बावनकुळे यांनी ही माहिती दिली. भाजपचे राज्य अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शिष्टमंडळ भेटणार आहे. पाऊस असल्याने 80 टक्के लोकांना मतदान करता येणार नाही, त्यामुळे नागरिकांवर अन्याय होईल. 92 नगरपरिषदेच्या सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येऊन मागणी करावी असेही आवाहन त्यांनी केले.

11:22 July 09

आठ वर्षानंतर कुरुंदा गाव पुन्हा पाण्याखाली

हिंगोली - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे हिंगोली. वसमत तालुक्यातील कुरुंदा या गावापासून वाहणाऱ्या नदीच्या पुराचा त्रास नेहमीच सहन करावा लागतो. गेल्या आठ वर्षानंतर पुन्हा या गावांमध्ये नदीच्या पुराचे पाणी शिरले. ग्रामस्थांना रात्र जागून काढण्याची वेळ आली. कित्यकांची कोंबड्या, गुरे, शेळ्या गोठ्यात पाण्यात गुदरमरून गेले. रस्त्यावर अन घरात कमरे इतके पाणी साचल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन आसरा शोधावा लागला.

09:12 July 09

जम्मूच्या दोडा जिल्ह्यातील थाथरी येथे ढगफुटी

श्रीनगर : अमरनाथ गुहेत ढगफुटीमुळे झालेला विध्वंस थांबत नाही तोच जम्मूच्या दोडा जिल्ह्यातील थाथरी येथे ढगफुटीची घटना समोर आली आहे. यामध्ये कोणतेही नुकसान झाले नसले तरी ढगफुटीमुळे अनेक वाहने आणि घरे ढिगाऱ्याखाली दबल्याचे सांगण्यात येत आहे.

08:10 July 09

देवळालीसह नाशिक जिल्हाभरातून अमरनाथ यात्रेसाठी गेलेले भाविक सुरक्षित

नाशिक - अमरनाथ यात्रेमध्ये शुक्रवारी सांयकाळच्या सुमारास ढगफुटी झाल्याने यात्रेकरूंचा मृत्यू तर काही यात्रेकरू जखमी झाले. अनेक यात्रेकरू बेपत्ता असल्याची बातमी विविध चॅनलवर प्रसिद्ध होताच खळबळ माजली. देवळालीसह नाशिक जिल्हाभरातून या यात्रेसाठी शेकडो नागरिक गेलेले आहेत. त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत होते. मात्र हे सर्व यात्रेकरू सुरक्षित असल्याची माहिती खुद्द यात्रेकरूंनी त्यांच्या कुटुंबियांना दिली आहे.

07:59 July 09

शिंजो यांना आदरांजली, भारतात एकदिवसीय दुखवटा

नवी दिल्ली - लाल किल्ला, राष्ट्रपती भवन आणि संसदेवर राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवले. काल ८ जुलै रोजी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या झाली. त्यांना आदरांजली म्हणून देशात एक दिवसीय राजकीय शोक पाळला जात आहे.

06:50 July 09

Breaking news: मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शाह यांची भेट मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा?

नवी दिल्ली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशिरा केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

Last Updated : Jul 9, 2022, 6:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details