महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Breaking news Maharashtra 28 May 2022 - नांदगांवला 10 मोरांचा मृत्यु...! विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज... - महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज २८ मे २०२२

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज पेज
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज पेज

By

Published : May 28, 2022, 9:22 AM IST

Updated : May 28, 2022, 4:47 PM IST

16:45 May 28

नांदगांवला 10 मोरांचा मृत्यु...! विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज...

नांदगांव तालुक्यातील आमोद्यात दहा मोरांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असुन या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्याकडून पाहणी करन घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. मृत्यूचे कारण अस्पष्ट असले तरी शवविच्छेदन केल्यानंतरच कारण स्पष्ट होणार असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.नांदगांव वनपरिक्षेत्र हे फार मोठे असुन येथे मोरांची व काळवीट शिकार होते असा आरोप करण्यात येत आहे.

15:33 May 28

समीर वानखेडेंवर कारवाई झाली पाहिजे - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी

आर्यन खानवरील आरोपांमध्ये तथ्य नाही, त्यामुळे त्याचे नाव आरोपपत्रातून वगळण्यात आले आहे. मला वाटते की केंद्रानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची माहिती दिली आहे. जर कोणी निरपराध व्यक्तीला फसवत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले त्यावरून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असे मला वाटते अशी माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

13:53 May 28

महिलांसाठी 1 रुपयांमध्ये 10 सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार

कोल्हापूर - मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्ताने महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. दारिद्र्यरेषेखालील महिला तसेच बचत गटाच्या महिलांसाठी 1 रुपयांमध्ये 10 सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहेत. राज्यातील 60 लाख महिलांना याचा फायदा होईल. 15 ऑगस्ट 2022 पासून या योजनेची सुरुवात होईल. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली.

11:55 May 28

भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात मनसेची तक्रार

भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात मनसेची तक्रार

मुंबई - दादरमधील मनसे उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील आणि मनसे जनहित कक्षाचे वकील यांनी दादर पोलिस स्टेशनमध्ये भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ब्रिजभूषण सिंग यांनी जिथे राज ठाकरे भेटतील तिथे दोन हात करीन या वक्तव्यावरून ही तक्रार केली आहे. दोन भाषिकांमध्ये तेढ आणि कायदा सुव्यवस्था बिघडवला जात आहे म्हणून तक्रार केली आहे.

10:16 May 28

गोरेगाव विनयभंग प्रकरणातील आरोपीला 30 मे पर्यंत पोलीस कोठडी

मुंबई - 25 मे रोजी एका 15 वर्षीय मुलीचा विनयभंग आणि तिच्याकडे अश्लील हावभाव केल्याप्रकरणी ओला कॅब चालकाला मुंबईतील गोरेगाव येथून अटक करण्यात आली. याप्रकरणी आरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पीएसआय सचिन पांचाळ यांनी ही माहिती दिलीय. मुरारी कुमार सिंग (२९) असे आरोपीचे नाव असून तो गोरेगाव येथे राहतो. तो मूळचा बिहारचा आहे. त्याच्यावर यापूर्वी काही खटले आहेत का ते देखील आम्ही शोधत आहोत असे पांचाळ यांनी सांगितले.

09:31 May 28

विरारमध्ये फर्निचरच्या दुकानांना आग

विरारमध्ये फर्निचरच्या दुकानांना आग

ठाणे - विरारमध्ये फर्निचरच्या दुकानांना आग लागली आहे. मोठी आग लागल्याने मालमत्तेची मोठी हानी झाली आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

09:18 May 28

Breaking news Maharashtra 28 May 2022 - उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाची हत्या

ठाणे - उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाची हत्या. पोलीस घटनास्थळी दाखल

Last Updated : May 28, 2022, 4:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details