महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Breaking News पावसाळी अधिवेशनाची सांगता, 19 डिसेंबरपासून नागपुरात होणार हिवाळी अधिवेशन - ठळक घडामोडी

Breaking news
Breaking news

By

Published : Aug 25, 2022, 7:40 AM IST

Updated : Aug 25, 2022, 10:23 PM IST

22:21 August 25

पावसाळी अधिवेशनाची सांगता, 19 डिसेंबरपासून नागपुरात होणार हिवाळी अधिवेशन

17 ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज समारोप झाला आहे. आता पुढील हिवाळी अधिवेशन सोमवार 19 डिसेंबर रोजी नागपूर येथे होणार आहे.

21:32 August 25

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले पांडू नरोटेचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू

दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा यांच्यासह यू.ए.पी.ए (UAPA) कायद्या अंतर्गत अटक करण्यात आलेले आरोपी पांडू नरोटे यांचा नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू आहे. पांडू नरोटे यांना H1N1 म्हणजेचं स्वाईन फ्लूच्या गंभीर संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

19:44 August 25

मेळघात आदिवासी युवकाला वन कर्मचाऱ्यांनी दिले लोखंडी सलाखाचे चटके

मासेमारी करणाऱ्या आदिवासी युवकाला वान व्याघ्र प्रकल्प कर्मचाऱयाकडून गरम लोखंडी सलाखेचे चटके देण्यात आले. या प्रकारामुळे मेळघाटात खळबळ उडाली आहे. संबंधित वन कर्मचाऱ्यांविरोधात धारणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीररीत्या भाजलेल्या युवकावर उपचार सुरू आहेत.

18:33 August 25

सोनाली फोगाटच्या मृतदेहावर जखमा, PM रिपोर्टमधून स्पष्ट

भाजपा नेत्या सोनाली फोगाट मृत्यूबाबत Sonali Phogat Case PM report एक नवीन माहिती पुढे आली आहे. सोनालीच्या शवविच्छेदन अहवालात तीच्या शरीरावर जखमा आढळून आल्या आहेत. या संदर्भातील माहिती गोवा मेडिकल कॉलेजचे डीन शिवानंद बांदेकरांंनी दिली आहे. तर सोनालीच्या मृत्यूबाबत पोलिसांनी योग्य तपास करण्याची मागणी तिच्या कुटुंबाने केली आहे. सोनाली फोगाट यांचा मृत्यूपूर्वी बलात्कार व खून करण्यात आल्याचा आरोप sonali Phogat rape murder allegation त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे सहकारी सुधीर सागवांन आणि सुखविंदर यांच्यावर केला होता. तसेच त्यांनी याविषयीची तक्रार बुधवारी अंजुना पोलीस स्थानकात Anjuna Police Station देखील केली होती. यावेळी त्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यापूर्वी या दोन्ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. Sonali Phogat murder case

17:24 August 25

तीन कोटींचे एमडी ड्रग्ज मानखुर्दमधून जप्त, दोन आफ्रिकन लोकांना अटक

मानखुर्द जवळील मुंबई पनवेल हायवेवर अमली पदार्थ विरोधी पथक बांद्रा युनिटने दोन किलो पेक्षा जास्त वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. यात दोन आफ्रिकन वंशाच्या लोकांना अटक केली आहे.

17:06 August 25

लवकरच राज्य सरकार 75 हजार जागा भरणार, मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत माहिती

पावसाळी अधिवेशनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या सरकारने एक मोठा निर्णय घेऊन 75 हजार रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही माहीती दिली आहे.

16:15 August 25

सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणी अंजना पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल

भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणी अंजना पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कलम 302 अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

15:17 August 25

औरंगाबाद आणि उस्मामानाबादच्या नामांतराचा ठराव विधानसभेत मंजूर

महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशनात औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तर नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव देण्याच्या ठरावालाही मंजूरी देण्यात आली आहे.

14:04 August 25

मुंबईत बनावट आधार कार्ड बनवणाऱ्याचा पर्दाफाश

मुंबईतील कांदिवली पोलिसांनी बनावट आधार कार्ड बनवणाऱ्याचा पर्दाफाश केला आहे. केवळ 2000 रुपयांमध्ये बनावट कागद तयार करायचा. तसेच मुस्लिमांना हिंदू नावाने आधार कार्ड बनवायचा.

13:53 August 25

धुळे पोलीस कॉन्स्टेबल विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

धुळे पोलीस कॉन्स्टेबल विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल. पोलीस मुख्यालय आवारातील पोलीस कर्मचारी निवासस्थान परिसरातील घटना.

13:48 August 25

काळा मारोती मंदिराजवळ भरधाव कारने अचानक घेतला पेट

दर्यापूर-अकोला महामार्गावर रामतीर्थ जवळ काळा मारोती मंदिराजवळ मंगळवार रात्री ९ च्या सुमारास अकोला येथून दर्यापूर येत असलेल्या भरधाव चारचाकी कारने अचानक पेट घेतला. वायरिंग शॉर्ट झाल्यामुळे कारने पेट घेतल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक वसंत शिंदे यांनी दिली.

10:33 August 25

यवतमाळ वस्तीगृहात रॅगिंग प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल

यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहात रॅगिंग प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल.

08:55 August 25

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात. आज घटनापीठापुढे पहिली सुनावणी

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात. आज घटनापीठापुढे पहिली सुनावणी

07:35 August 25

औरंगाबाद आणि उस्मामानाबादच्या नामांतराचा ठराव विधानसभेत मंजूर

कर्नाटकात तुमकुरूमध्ये अपघात. ९ जण ठार. तुमाकुरू जिल्ह्यात जीपची ट्रकला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात तीन मुलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात 11 जण जखमी झाले आहेत.

Last Updated : Aug 25, 2022, 10:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details