महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Breaking News Live : एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी जगदीप धनखर यांना उमेदवारी; जेपी नड्डा यांची घोषणा - महाराष्ट्र ठळक घडामोडी

Breaking news
Breaking news

By

Published : Jul 16, 2022, 7:44 AM IST

Updated : Jul 16, 2022, 8:01 PM IST

19:54 July 16

एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी जगदीप धनखर यांना उमेदवारी; जेपी नड्डा यांची घोषणा

एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी जगदीप धनखर यांना उमेदवारी; जेपी नड्डा यांची घोषणा

17:08 July 16

मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार - दीपक केसरकर

मुंबई - मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की, ते काँग्रेससोबत कधीच जाणार नाहीत आणि मी बाळासाहेब ठाकरेंना फॉलो करतोय. मी कधीही काँग्रेससोबत जाणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार व शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली आहे.

15:36 July 16

शिंदे सरकारच्या नामांतरण निर्णयाविरोधात शिवसेनेचे औरंगाबादेत आंदोलन

औरंगाबाद -औरंगाबाद् आणि उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय आज महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. हा निर्णय याआधीच महाविकास आघाडीने घेतला असल्याचे सांगत शिंदे सरकारच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने (ठाकरे गट) औरंगाबादमध्ये आंदोलन केले आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण राज्य सरकारने आज जाहीर केले आहे. महाविकास आघा़डी सरकारने यापूर्वी घेतलेला निर्णय बेकायदेशीर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते.

13:11 July 16

मुख्यमंत्रीही थेट जनतेतून निवडून देण्याचा निर्णय करावा

पुणे - मुख्यमंत्रीही थेट जनतेतून निवडून देण्याचा निर्णय करावा. विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी. बारामती भेटीवर आल्यानंतर त्यांनी ही मागणी केली.

13:11 July 16

पुण्याजवळ ट्रकच्या धडकेत इसम जागीच ठार

पुण्याजवळ ट्रकच्या धडकेत इसम जागीच ठार. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे दुर्लक्ष

13:11 July 16

उघड्या गटारीत पडून घोड्याचा मृत्यू

डहाणू नगरपरषदेच्या मुख्य रस्त्यावरील उघड्या गटारीत पडून घोड्याचा मृत्यू

12:00 July 16

औरंगाबादचे संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धाराशिव - मंत्रिमंडळ निर्णय

औरंगाबादचे पुन्हा संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धाराशिव. राज्य मंत्रिमंडळाचा पुन्हा निर्णय. कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यानी केले स्पष्ट

11:53 July 16

नाशिकमधील चाैक मंडईतील बुरुड गल्ली येथे जुन्या वाड्याची भिंत काेसळून पितापुत्र जखमी

नाशिक - जुने नाशिकमधील चाैक मंडईतील बुरुड गल्ली येथे जुन्या वाड्याची भिंत काेसळून पितापुत्र जखमी झाले. युनूस शेख(55) व कादीर शेख (30, दाेघे रा. बागवानपुरा) अशी जखमी पिता पुत्रांची नावे आहेत. मागील पाच दिवसात नाशिक शहरात चार जुने वाडे कोसळलेत.

10:29 July 16

स्वतःच्या जीवावर निवडून या मग काय ते बोला

मुंबई - आधी स्वतःच्या जीवावर निवडून या मग काय ते बोला. संजय राऊत यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका. पत्रकार परिषद घेऊन केली टीका. ठाकरे सरकारचे निर्णय रद्द केल्याने राऊत यांची शिंदे फडणवीस यांच्यावर टीका

09:55 July 16

मुंबईतून मोटारसायकल रॅलीची सुरूवात

मुंबई - स्वातंत्र्याचे हे ७५ वे वर्ष आझादी का अमृत महोत्सव म्हणून साजरे केले जात आहे. आम्ही त्यात उत्साही सहभाग घेत आहोत आणि मोटरसायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवून साबरमतीला जाणार आहोत. तिथे इतर अनेक लोक जमतील आणि सर्वजण १३-१४ ऑगस्टपर्यंत दिल्लीला पोहोचू असे मध्य रेल्वेचे जीएम अनिल कुमार यांनी सांगितले.

08:02 July 16

गैरहजर राहिल्याप्रकरणी जालन्यात 11 पोलीस निलंबित

जालना -जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांनी 11 पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे. त्यांच्याविरुद्ध कामावर अहवाल न दिल्याबद्दल चौकशी सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी सांगितले की, हे पोलीस अनेक दिवस पूर्व परवानगी किंवा वैध कारणाशिवाय कर्तव्यावर गैरहजर होते.

07:46 July 16

साल्हेर किल्ल्यावरुन पाय घसरुन पडल्याने एकाचा मृ्त्यू

नाशिक - नाशिकच्या सटाणा तालुक्यातील साल्हेर किल्ल्यावरुन ( Salher Fort ) 2 पर्यटक पाय घसरुन, दरीत पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका पर्यटकाचा ( Tourists ) मृत्यू झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. भावेश शेखर अहिरे असे मयत तरुणाचे नाव आहे. तर मनिष सुनील मुठेकर असे जखमी तरुणाचे नाव आहे.

07:39 July 16

Breaking news: कोयनेच्या पाणीसाठ्याने गाठली 'पन्नाशी'

सातारा - कोयना धरणातील पाणीसाठ्याने ५० टीएमसीचा टप्पा गाठला आहे. शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास धरणातील पाणीसाठा 50.4 टीएमसी झाला आहे. धरणाची पाणी पातळी 2107 फूट झाली. धरणाच्या पायथा वीज गृहातून 2100 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.

Last Updated : Jul 16, 2022, 8:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details