महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Breaking news live page 8 June 2022; हृदयात राम आणि हाताला काम असे आमचे हिंदुत्व - उद्धव ठाकरे

Breaking news live page 8 June 2022
Breaking news live page 8 June 2022

By

Published : Jun 8, 2022, 8:19 AM IST

Updated : Jun 8, 2022, 9:27 PM IST

21:09 June 08

हृदयात राम आणि हाताला काम असे आमचे हिंदुत्व - उद्धव ठाकरे

औरंगाबाद- हृदयात राम आणि हाताला काम असे आमचे हिंदुत्व असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभेत म्हटले.

20:27 June 08

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर न करता पाणी दिल्यास संभाजीराजेसुद्धा टकमक टोक दाखवितील- उद्धव ठाकरे

औरंगाबाद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, की पाणी प्रश्न असताना मी तुमच्या समोर आलो, कारण मी प्रामाणिक आहे. काही दिवसांपूर्वी पाणी प्रश्न गांभीर होता, आठ दिवसाला येणार पाणी आता पाच दिवसाला येत आहे. बैठक घेऊन जुनी योजना काढून् नवीन योजन उभारण्यासाठी परवानगी दिली. कोरोनात काळ गेला मात्र त्याला घाबरत नाही, विभागीय आयुक्तांना सांगितलं हातात दंडा घ्या आणि योजना पूर्ण करा, ठेकेदाराने नाटक केले तर सरळ तुरुंगात टाका अस सांगितले. औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नाव करणार आहोत. त्याआधी विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज करा, असा केंद्राकडे प्रस्ताव केला आहे.

20:08 June 08

महाराष्ट्रात नेतृत्व करण्याची क्षमता- संजय राऊत

औरंगाबाद - शिवसेनेची सभा गर्जना करणारी सभा आहे. महाष्ट्रात नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर सभेत म्हटले आहे.

19:39 June 08

अनिल देशमुख, नवाब मलिक राज्यसभेसाठी मतदान करणार?, गुरुवारी न्यायालयात सुनावणी

राज्यसभेच्या निवडणुकीची ( RajyaSabha Election 2022 ) रणधुमाळी महाराष्ट्रात सध्या सुरु आहे. त्यातच तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते, मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik ) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांना राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याची संधी मिळेल का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आज ( 8 मे ) या अर्जावर निकाल येईल, असं सांगितलं जात होतं. मात्र, तब्बल तीन ते चार तासाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने ( Mumbai Session Court ) निकाल राखून ठेवला आहे. उद्या ( 9 मे ) सकाळी 11 वाजता निकालावर सुनावणी होणार आहे.

19:04 June 08

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात मोठी कारवाई; फरार सौरभ महाकालला अटक

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची काही दिवासांपूर्वी दिवासाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याप्रकरणातील पुणे जिल्ह्यातील फरार आरोपी शार्प शूटर सौरभ महाकालला अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सौरभ महाकाल हा मागील मागील काही दिवसांपासून फरार ( Sidhu MooseWala Murder Saurabh Mahakal Arrested ) होता.

16:12 June 08

विधान परिषद निवडणुकीकरिता भाजपकडून 'या' ४ नेत्यांनी भरले उमेदवारी अर्ज

मुंबई-विधान परिषद निवडणुकीकरिता भाजपने प्रवीण दरकेर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय या चार उमेदवारांचे अर्ज भरले आहे. उमा गिरीश खापरे हे उद्या अर्ज भरणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली.

16:04 June 08

विधान परिषद निवडणुकीकरिता शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना तिकीट

मुंबई- राज्यसभेची निवडणूक 10 जूनला ( Rajya Sabha elections in Maharashtra ) होणार आहे. यासाठीची सर्व तयारी महाविकास आघाडी तसेच भारतीय जनता पक्षाकडून जोरदार सुरू आहे. मात्र, 10 जूनला राज्यसभा निवडणूक संपताच 20 जूनला विधान परिषदेसाठी निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या दहा आमदारांचा कार्यकाळ संपल्यामुळे दहा जागांसाठी ( Maharashtra Legislative Council elections ) ही निवडणूक होणार आहे.

15:34 June 08

टेनिसपटू ऐश्वर्या जाधवची विम्बल्डन स्पर्धेसाठी निवड, देशातील पहिली खेळाडू

कोल्हापूर- एशियन टेनिस फेडरेशनच्यावतीने इंग्लड येथे होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेसाठी कोल्हापूरातील टेनिसपटू ऐश्वर्या जाधव हिची आशियाई संघात निवड झाली आहे. या आशियाई संघात निवड होणारी ती देशातील एकमेव खेळाडू ठरली आहे. तिच्या या निवडणीनंतर संपूर्ण कोल्हापुरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.

14:01 June 08

उमेदवारी दिल्याने पाडवी-अहिर यांनी मानले उद्धव ठाकरे यांचे आभार

मुंबई - उमेदवारी मिळाल्याने आमशा पाडवी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानलेत. त्यांनी मोठी जबाबदारी दिली ती पूर्ण जबाबदारीने पार पाडेल असे ते म्हणालेत. विधान परिषद स्थापन झाल्यापासून आदिवासी व्यक्तीला संधी दिली नव्हती. पहिल्यांदा आदिवासी व्यक्तीला संधी दिली मिळाली आहे. उद्धव ठाकरे यांचा विश्वास सार्थ करून दाखवेन असे ते म्हणाले. तर सचिन अहिर यांनी श्रद्धा आणि सबुरीचे फळ मिळाल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरेंनी शब्द दिला होता. नवीन झेप सुरू होत आहे. खूप जबाबदारीने विश्वास ठेवला आहे तो सार्थकी लावणार असे ते म्हणालेत.

13:47 June 08

अविनाश भोसले यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात

अविनाश भोसले यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात

मुंबई - पुण्याचे व्यवसायिक अविनाश भोसले यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे. कोर्टाने अविनाश भोसलेंना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविले. सीबीआय कस्टडी वाढवून देण्यास मुंबई सत्र न्यायालयात विशेष सीबीआय कोर्टाचा नकार.

12:01 June 08

इस्लामला संरक्षक कवच बनवून या लोकांना मानवतेची हत्या करायची आहे - नक्वी

मुंबई -अल-कायदा ही समस्या आहे, मुस्लिमांचे संरक्षण नाही. इस्लामला संरक्षक कवच बनवून या लोकांना मानवतेची हत्या करायची आहे. जे पाकिस्तानच्या प्रचारात अडकले आहेत, त्यांनी समजून घ्यावे की भारतातील विविधतेतील एकतेची ताकद कमकुवत होऊ शकत नाही. असे मत केंद्रीय मंत्री मुख्तार नक्वी यांनी व्यक्त केले आहे. जे निवडक लोक आता मानवी हक्कांबद्दल बोलत आहेत. जिथे मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे, अल्पसंख्याकांची खुलेआम कत्तल केली जात आहे, गुन्हेगारी आणि दडपशाहीने डोळे बंद केले आहेत. असेही नक्वी म्हणाले.

11:51 June 08

विधान परिषदेसाठी भाजपकडून राम शिंदे यांचे नाव निश्चित

मुंबई - विधान परिषदेसाठी भाजपकडून राम शिंदे यांचे नाव निश्चित. विधानभवनात अर्ज दाखल करण्यासाठी राम शिंदे यांची उपस्थिती.

11:39 June 08

नवाब मलिक अनिल देशमुख राज्यसभेकरिता मतदानाला परवानगी मिळण्याकरिता अर्जावर सुनावणी सुरू

नवाब मलिक अनिल देशमुख राज्यसभेकरिता मतदानाला परवानगी मिळण्याकरिता अर्जावर सुनावणी सुरू

मुंबई - नवाब मलिक अनिल देशमुख राज्यसभेकरिता मतदानाला परवानगी मिळण्याकरिता अर्जावर सुनावणी सुरू. मुंबई सत्र न्यायालयात आज नवाब मलिक तर्फे वरिष्ठ एड अमित देसाई करणार आहेत युक्तिवाद. अनिल देशमुख यांच्यातर्फे आबाद पोंडा युक्तिवाद करतील.

11:15 June 08

बारावी परीक्षेचा निकाल जाहीर

पुणे -बारावी परीक्षेचा 94.22 टक्के निकाल लागला आहे. यंदा देखील कोकण विभागाचा निकाल 97.21 टक्के सर्वाधिक लागला आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा 90.91 टक्के लागला आहे. यंदाही मुलींचीच बाजी आहे. मुलींचा निकाल 95.35 टक्के तर मुलांचा निकाल 93.29 टक्के लागला आहे.

10:51 June 08

अण्णा हजारे १९ जूनला जाणार दिल्लीला

अहमदनगर - सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे 19 जून रोजी दिल्लीत जाणार आहेत. ते येथे त्यांच्या 'राष्ट्रीय लोकांदोलन' या नवीन संस्थेसाठी 1 दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेणार आहेत.

10:38 June 08

भिवंडीत साईबाबा कंपाऊंड परिसरात गोडाऊनला भीषण आग

ठाणे :भिवंडी शहरातील आस बीबी रोड येथील साईबाबा कंपाऊंड परिसरात गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी ९ च्या सुमारास घडली आहे.
या गोडाउनमध्ये प्लास्टिक वितळून गठ्ठे तयार केले जात होते. मात्र अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून आतापर्यंत आगीत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले.

10:00 June 08

आज बारावीचा निकाल जाहीर होणार

मुंबई -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ. 12 वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार बुधवारी दि. 8 जून रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. आज बारावीचा निकाल जाहीर होणार असल्याने विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली आहे.

09:55 June 08

कंगनाने केली नुपूर शर्मा यांची पाठराखण

मुंबई - कंगनाने नुपूर शर्मा यांची पाठराखण केल्याचे दिसत आहे. तिने इन्स्टाग्रामवर त्याप्रकारची पोस्ट केली आहे. देशात कायद्याचे राज्य आहे. कुणी इथे गुंडगिरी करण्याची गरज नाही असेही तिने शर्मा यांना धमकावणाऱ्यांना सुनावले आहे.

09:30 June 08

क्लिनिकल चाचणीत कर्करोगाच्या सर्वच रुग्णांचा कर्करोग पूर्णपणे नाहीसा

नवी दिल्ली: एक चमत्कार आणि 'इतिहासात पहिल्यांदाच' असे दिसते, एका लहान क्लिनिकल चाचणीत असे आढळून आले आहे की प्रायोगिक उपचार घेतलेल्या प्रत्येक गुदाशय कर्करोगाच्या रुग्णाला त्यांचा कर्करोग पूर्णपणे नाहीसा झाल्याचे आढळून आले आहे. हे पहिल्यांदाच घडले आहे. न्यूयॉर्कच्या मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरचे डॉ. लुईस ए. डायझ जे. म्हणाले की "कर्करोगाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे".

08:52 June 08

रिझर्व बँक धोरणात्मक व्याजदर वाढवणार?

मुंबई : रिझर्व बँकेची सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समिती (MPC) धोरणात्मक व्याजदर वाढवणार आहे. कारण महागाई गेल्या अनेक महिन्यांपासून मध्यवर्ती बँकेच्या सहनशीलतेच्या मर्यादेच्यावर राहिली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आज पॉलिसी रेपो दरात 40 आधार अंकांनी 4.80 टक्क्यांनी वाढ करेल असा अंदाज आहे. चालू आर्थिक वर्षासाठी महागाईचा अंदाज वाढवेल. बाजार विश्लेषक आणि अर्थशास्त्रज्ञांच्या मते, 5.7 टक्क्यांच्या आधीच्या अंदाजापेक्षा 6 टक्क्यांच्या वर जाईल असे दिसते.

08:13 June 08

Breaking news live page 8 June 2022, हृदयात राम आणि हाताला काम असे आमचे हिंदुत्व - उद्धव ठाकरे

औरंगाबाद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, की पाणी प्रश्न असताना मी तुमच्या समोर आलो, कारण मी प्रामाणिक आहे. काही दिवसांपूर्वी पाणी प्रश्न गांभीर होता, आठ दिवसाला येणार पाणी आता पाच दिवसाला येत आहे. बैठक घेऊन जुनी योजना काढून् नवीन योजन उभारण्यासाठी परवानगी दिली. कोरोनात काळ गेला मात्र त्याला घाबरत नाही, विभागीय आयुक्तांना सांगितलं हातात दंडा घ्या आणि योजना पूर्ण करा, ठेकेदाराने नाटक केले तर सरळ तुरुंगात टाका अस सांगितले. औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नाव करणार आहोत. त्याआधी विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज करा, असा केंद्राकडे प्रस्ताव केला आहे.

शिवसेनेची सभा गर्जना करणारी सभा आहे. महाष्ट्रात नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर सभेत म्हटले आहे.

कोल्हापूर- एशियन टेनिस फेडरेशनच्यावतीने इंग्लड येथे होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेसाठी कोल्हापूरातील टेनिसपटू ऐश्वर्या जाधव हिची आशियाई संघात निवड झाली आहे. या आशियाई संघात निवड होणारी ती देशातील एकमेव खेळाडू ठरली आहे. तिच्या या निवडणीनंतर संपूर्ण कोल्हापुरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.

लातूर - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 दिवसांनंतर सांगितल्यावर नुपूर शर्मा यांना निलंबित केले. आम्ही म्हणत असताना, मुद्दा उपस्थित करून कारवाई झाली नाही. कतार, सौदी अरेबिया, बहरीनमध्ये काही घडले तेव्हा त्यांनी कृती केली, अशी टीका लातूरमध्ये AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केली.

Last Updated : Jun 8, 2022, 9:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details