महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Breaking News Live : फुटीर गटाची विनंती लगेच मान्य करतो; उद्धव ठाकरेंची 'सामना'ला मुलाखत

Breaking news
Breaking news

By

Published : Jul 23, 2022, 11:14 AM IST

Updated : Jul 23, 2022, 9:29 PM IST

21:29 July 23

मुंबईतील डोंगरी परिसरातून तीन अंमली पदार्थ तस्करांना अटक

मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या आझाद मैदान युनिटने डोंगरी परिसरातून तीन अंमली पदार्थ तस्करांना अटक केली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 19 लाख रुपये किमतीचे 125 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले. एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

16:44 July 23

फुटीर गटाची विनंती लगेच मान्य करतो; उद्धव ठाकरेंची 'सामना'ला मुलाखत

मुंबई - फुटीर गटाची विनंती लगेच मान्य करतो अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. 26 आणि 27 जुलै रोजी सामनावर ही मुलाखत प्रकाशित होणार आहे.

15:34 July 23

दिल्लीतील सरकारला शिवसेना संपवायची आहे - संजय राऊत

हे महाराष्ट्रातील जनतेसाठी धक्कादायक आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी 56 वर्षांपूर्वी हिंदुत्वाचा विचार करून पक्षाची स्थापना केली आणि निवडणूक आयोग त्यांच्या संघटनेवर प्रश्न उपस्थित करत आहे. दिल्लीला आमचा पक्ष नष्ट करायचा आहे. आज शिवसेनेचे एकमेव नेते उद्धव ठाकरे आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

14:06 July 23

अभिनेते दीपेश भान यांचे आज सकाळी निधन

'भाबीजी घर पर हैं' या सुप्रसिद्ध टीव्ही मालिकेत मलखानची भूमिका साकारणारे अभिनेते दीपेश भान यांचे आज सकाळी निधन झाले. अभिनेते 41 वर्षांचे होते.

12:26 July 23

लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल

मुंबई - मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. ते मुंबईत बोलत होते. विकासकामांना स्थगिती राज्य सरकार देणार नाही. संभाजी महाराज यांचे स्मारकही होईल. फक्त काही निर्णयांवर आक्षेप आहे त्यावर विचार होईल. गडचिरोलीत नक्षलवाद कमी करणे तिथे नक्षलवाद्यांकडून अडथळे आणण्यात आले, मात्र पोलिसांनी चांगली कामगिरी केली असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मला यापूर्वी ही धमक्या आल्या आहेत झेड प्लस सुरक्षेसाठी शिफारस झाली होती शंभूराज देसाई यांनी ती भूमिका घेतली होती

09:47 July 23

फुटीरांनी वेगळा पक्ष काढावा - संजय राऊत

मुंबई - फुटले त्यांनी आनंदात राहावे, त्यांचा पक्ष त्यांनी बनवावा असे विधान खा. संजय राऊत यांनी केले आहे. हजारो शिवसैनिक महाराष्ट्रासाठी शहीद असताना आमच्याकडे पुरावे मानले जात आहेत.
दंगलीत आमच्या सैनिकांवर खटले दाखल झाले हा पुरावा आहे. काही लोक फोडले म्हणून शिवसेना फुटली असं होणार नाही असेही ते म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

Last Updated : Jul 23, 2022, 9:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details