माझ्यावर झालेल्या या हल्ल्याची स्वतंत्र्य स्वरूपाने चौकशी व्हावी आणि निवडणूक आयोग्याने यांची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी. एखाद्या पार्टीच्या प्रमुखावर अश्या प्रकारे दोन जण येऊन गोळीबाराचा हल्ला करत असतील तर ते बरोबर नाही आहे. उत्तरप्रदेशमध्ये भिती निर्माण काम काही पक्षाकडून सुरू आहे. मात्र आम्ही घाबरणारे नाही आहेत आम्ही मोठ्या ताकदीने लढू असे माध्यमांशी बोलताना असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले आहे.
Bullets Fired On Owaisi Vehicle : दोन जणांनी माझ्या कारवर तीन-चार राऊंड गोळीबार केला - असदुद्दीन ओवेसी
19:28 February 03
'हल्ल्याची स्वतंत्र्य स्वरूपाने चौकशी व्हावी'
18:33 February 03
'दोन जणांनी माझ्या कारवर तीन-चार गोळ्या झाडल्या'
असदुद्दीन ओवेसी यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, मी मेरठ (उत्तर प्रदेश) मध्ये निवडणूक कार्यक्रम झाल्यानंतर दिल्लीला जात होतो. यावेळी किठौर येथील छाजरसी टोल प्लाझाजवळ दोन जणांनी माझ्या कारवर तीन-चार गोळ्या झाडल्या. ते एकूण तीन ते चार लोक होते. माझ्या वाहनाचे टायर पंक्चर झाले होते, मी आता दुसऱ्या वाहनाने जात आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
18:11 February 03
गाडीवर मेरठ येथे तीन ते चार गोळ्या झाडल्या
नवी दिल्ली - निवडणूक कार्यक्रम संपल्यानंतर दिल्लीला निघालेल्या एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर तीन-चार राऊंड गोळीबार ( BULLETS FIRING ON OWAISI VEHICLE ) करण्यात आला. उत्तर प्रदेशातील मेरठ येथे निवडणूक कार्यक्रमात भाग घेऊन दिल्लीला परतत असताना किठौर येथील छजरासी टोल प्लाझाजवळ दोन जणांनी त्याच्या कारवर गोळीबार केला ( Bullets Fired On Owaisi Vehicle ), असा दावा त्यांनी केला आहे.