मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट आली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत आहे. गुरुवारी ५७०८, शुक्रवारी ५००८, शनिवारी ३५६८ रुग्णांची नोंद झाली. आज त्यात आणखी घट होऊन २५५९ रुग्णांची नोंद झाली आहे. आज १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या घटत असल्याने सध्या १९ हजार ८०८ सक्रिय रुग्ण आहेत.
Breaking News : शाळा, महाविद्यालयासह रेल्वे स्थानक बाँबने उडविणार, ठाणे पोलिसांना धमकीचा ईमेल - आजच्या ताज्या बातम्या
19:24 January 23
मुंबईत रुग्णसंख्येत घट सुरूच, २५५९ नव्या रुग्णांची नोंद, १३ जणांचा मृत्यू
19:09 January 23
डिसले गुरुजींना 153 दिवसांची रजा मंजूर
डिसले गुरुजींना 153 दिवसांची रजा मंजूर; जिल्हा शिक्षण विभागाची नमती भूमिका, सुट्टीच्या दिवशी शिक्षण विभागाने काम करून डीसले गुरुजींना मंजूर केली रजा.
18:30 January 23
शाळा, महाविद्यालयासह रेल्वे स्थानक बाँबने उडविणार, ठाणे पोलिसांना धमकीचा ईमेल
ठाणे - कोर्टनाका येथील ठाणे पोलीस शाळेच्या मेल आयडीवर शाळा, महाविद्यालय आणि रेल्वे स्थानक बाँबने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल आल्याने खळबळ उडाली आहे. संपूर्ण हिंदुस्थानात जिहादचे पालन करण्यासाठी कुर्बानी आणि धमाका हे दोन मार्ग असल्याचे या मेलवरील मजकूरात म्हटले आहे. या घटनेप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणे पोलिसांच्या सायबर कक्षाकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.
17:15 January 23
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री आठ वाजता शिवसैनिकांशी साधणार संवाद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री आठ वाजता शिवसैनिकांशी साधणार संवाद
16:11 January 23
पीव्ही सिंधूने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली
पीव्ही सिंधूने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली, अंतिम फेरीत मालविका बनसोडचा २१-१३, २१-१६ असा केला पराभव.
16:08 January 23
एसटीतील कामगार संघटनेची मान्यता रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान
मुंबई - एसटी महामंडळात गेल्या २५ वर्षांहून मान्यताप्राप्त असलेल्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची मान्यता रद्द करण्याचे आदेश औद्योगिक न्यायालयाने दिले होते. या निर्णयाविरोधात मान्यताप्राप्त संघटनेच्या फायद्यासाठी मुंबई उच्च न्यायालय येथे रिट पिटीशन क्रमांक १६६१ अन्वये अपिल दाखल केल्याची माहिती, महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी दिली.
15:39 January 23
एमपीएससीचा पेपर फुटलाच नाही-एमपीएससीचे स्पष्टीकरण!
मुंबई - आज महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडून राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 परीक्षेचे आयोजन राज्यभरात करण्यात आले आहे. मात्र, नागपूरात एका परीक्षा केंद्रावर राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर फुटीचा आरोप करत विद्यार्थी संघटनाने आंदोलन सुरु केले होते. त्यानंतर काही वेळातच महाराष्ट्र लोकल सेवा आयोगाकडून याबाबद स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पेपर फुटल्यासंदर्भात काही समाजमाध्यमामध्ये प्रसिद्ध झालेली बातमी चुकीची आहे, अशी कोणतीही घटना घडलेली नाही, असं स्पष्टीकरण आयोगाकडून देण्यात आले आहे.
13:33 January 23
Breaking News : भारतात 162 कोटी कोरोना लसीचे डोस दिले; आरोग्य मंत्रालयाची माहिती
नवी दिल्ली- भारतात 162 कोटी कोरोना लसीचे डोस दिले; आरोग्य मंत्रालयाची माहिती
13:31 January 23
Breaking News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बाळ ठाकरे यांच्यासह सुभाष चंद्र बोस यांना जयंतीनिमीत्त अभिवादन केले
Breaking News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बाळ ठाकरे यांच्यासह सुभाष चंद्र बोस यांना जयंतीनिमीत्त अभिवादन केले आहे. हे अभिवादन त्यांनी आपल्या मुंबईतील सरकारी निवास्थानी केले आहे.
13:11 January 23
नागपुरात एबीव्हीपीच्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
नागपूर - भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना तसेच काही एबीव्हीपीच्या पदाधिकारी ज्यांच्यामुळे आंदोलन पेटले, असा आरोप करत पोलिसांनी ताब्यात त्यांना घेतले. त्यानंतर पोलीस वाहनात बसवून त्यांना आता तेथून नेण्यात आले.
12:02 January 23
Breaking News : मुंबईतील शिवाजी नगर सामूहिक बलात्कार प्रकरणात दोन अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक
शिवाजी नगर सामूहिक बलात्कार | दोन अल्पवयीन मुलांसह चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे: अर्जुन राजणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शिवाजी नगर पीएस
11:54 January 23
Breaking News : नागपूरमधील सदर्न पॉईंट हायस्कूलमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर फुटला; पोलीस अधिकाऱ्यांकडून मात्र आरोपांचे खंडन
नागपूर -नागपूरमधील सदर्न पॉईंट हायस्कूलमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर फुटला; पोलीस अधिकाऱ्यांकडून मात्र आरोपांचे खंडन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आरोप घेण्यात येणार होता. मात्र या ठिकाणी परीक्षेचे प्रमुख नसतानाच पेपरच्या पॉकेटचे सील फोडण्यात आले असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आला. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला लागलीच पोलीस अधिकारी येथे पोहोचून त्यांनी चौकशी केली, यामध्ये पेपरचे तीन सील असतात त्यापैकी एक सील फुटले होते असे कबूल केले. यामध्ये एका क्लर्कची चूक आहे, पण यामध्ये पेपर हा बाहेर न पडल्याने पेपर फुटला नाही असेही पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी माध्यमांना माहिती दिली.
यामधून कारवाईच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परषदेचे अधिकरी केंद्रासमोर ठिय्या देऊन बसले आहे.
10:10 January 23
Breaking News : भारतात गेल्या 24 तासांत 3,33,533 नवे कोरोना रुग्ण आढळले, 525 रुग्णांचा मृत्यू; तर 2,59,168 रुग्ण झाले बरे
मुंबई - भारतात गेल्या 24 तासात 3,33,533 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. (कालच्या तुलनेत 4,171 कमी), तर 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 2,59,168 रुग्ण बरे झाले आहेत.
सक्रिय प्रकरणः 21,87,205
दैनिक सकारात्मकता दर: 17.78%)
09:55 January 23
Breaking News : भारतात १६१.९२ कोटी (१,६१,९२,८४,२७०) लोकांचे लसीकरण पुर्ण
मुंबई - आज सकाळी ७ वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार भारतातील कोविड-१९ लसीकरण कव्हरेज १६१.९२ कोटी (१,६१,९२,८४,२७०) ओलांडले आहे.
09:53 January 23
Breaking News लता मंगेशकर यांची प्रकृतीत स्थीर;मात्र काही दिवस आयसीयुमध्येच ठेवणार
मुंबई - कालपासून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी तिला आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तिच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करा: गायिका लता मंगेशकर यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार करत असलेले डॉ. प्रतित समदानी
08:35 January 23
Breaking News :कमला इमारतीला लागलेल्या आगीची चौकशी होणार; 15 दिवसांत बीएमसी आयुक्तांना अहवाल सादर करणार
मुंबई -कमला इमारतीच्या आगी प्रकरणाची चौकशी होणार; 15 दिवसांत बीएमसी आयुक्तांना अहवाल सादर करणार उपमहापालिका आयुक्त स्तरावरील अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणार आहे.