- मुंबई - विद्यापीठांच्या जमीनी बळकावण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न - देवेंद्र फडणवीस
- चर्चा न करता विद्यापीठ सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले
- विद्यापीठ सुधारणा विधेयकाविरोधात कोर्टात दाद मागणार
- मंत्री आता कुलगुरुंपेक्षा मोठे होतील - फणडवीस
Breaking live page - विद्यापीठांच्या जमीनी बळकावण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न - देवेंद्र फडणवीस - Breaking news maharashtra
21:22 December 28
विद्यापीठांच्या जमीनी बळकावण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न - देवेंद्र फडणवीस
18:55 December 28
शेवटचा आरोपी पकडला जाई पर्यंत हा शोध सुरू राहील, पेपर फुटी प्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
शेवटचा आरोपी पकडला जाई पर्यंत हा शोध सुरू राहील - दिलीप वळसे पाटील
- आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरणी प्रश्न पत्रिकेतील ९२ प्रश्न फुटले.
- या संदर्भात आरोपी अटक करण्यात आले व यांच्या तपासात हे लक्ष्यात आले की हा फक्त आरोग्य विभागाच्या पेपर चा मुद्दा नाही तर म्हाडा परीक्षेचे पण पेपर फुटणार आहेत.
- त्यानंतर असे लक्षात आले की २०२० टीईटी परीक्षेचे पेपर ही फुटलेले आहेत.
- या प्रकणात शेवटचा आरोपी पकडला जाई पर्यंत हा शोध सुरू राहील.
14:03 December 28
सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी
सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी
तीन वाजण्याच्या सुमारार सुनावणी होणार
सिंधुदुर्गमध्ये राज्याचे पोलीस महासंचालक दाखल
गोवा आणि मुंबईला पोलिसांची शोधपथके रवाना
11:47 December 28
अमरावतीच्या चांदुर बाजार तालुक्यात पाऊस आणि गारपीट
अमरावती फ्लॅश
अमरावतीच्या चांदुर बाजार तालुक्यात पाऊस आणि गारपीट
चांदुर बाजार तालुक्यातील वणी बेलखेडा आणि घाटलाडकी परिसरात गारपीट
गारपिटीने परिसरातील संत्राचा आंबिया बहार हातातून जाण्याची शक्यता
पाऊस आणि गारपीट झाल्याने तूर आणि चणा पिकाचेही नुकसान
सकाळपासून जिल्ह्यात धुक्याचे वातावरण, शेतकरी चिंतेत
11:38 December 28
आरोग्य विभागाच्या गट क ची ही पेपरफुटी झाल्याचे निष्पन्न
Pune
आरोग्य विभागाच्या गट क ची ही पेपरफुटी झाल्याचे निष्पन्न
न्यासाच्या माध्यमातून फोडण्यात आला पेपर
आरोपी परीक्षार्थींकडून 4 ते 8 लाख घेत होते
2 जणांना करण्यात आली अटक
10:04 December 28
दाट धुक्यामुळे नागपुरातील विमानसेवा प्रभावित
नागपूर
विदर्भात पावसाची शक्यता व्यक्त केल्यानंतर आज दाट धुक्यामुळे नागपुरातील विमानसेवा प्रभावित
3 विमानाच्या उड्डाणाला 2 तासांचा विलंब झाल्याची माहिती
2 इंडिगो व 1 एअर इंडियाची विमाने धावपट्टीवर सकाळी व्हिजिबिलिटी 500 मीटर असल्याने उड्डाणाला विलंब
09:58 December 28
नवले पुलाजवळ पुन्हा अपघात - तीन जण मृत्य झाल्याची प्राथमिक माहिती
Pune
नवले पुलाजवळ पुन्हा अपघात
तीन जण मृत्य झाल्याची प्राथमिक माहिती
गेल्या काही दिवसांपासून सतत नवले पुलाजवळ होत आहे अपघात
09:55 December 28
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली रुग्णालयात
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली रुग्णालयात
कोरोना रिपोर्ट आला पॉझिटिव्ह
रिपोर्ट आल्यानंतर दाखल केले दवाखाण्यात
09:22 December 28
Breaking live page - भाईपूर नजीक १ दिवसाचा बाळाचा पुलाच्याखाली मृत्यू
अमरावती ब्रेकिंग
भाईपूर नजीक १ दिवसाचा बाळाचा पुलाच्याखाली मृत्यू
मुलगी झाली म्हणून बाळाला पुलाच्याखाली फेकण्याचा निंदनीय प्रकार